Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा शनिवारी संपल्या. भारताची गोल्फपटू अदिती अशोक हिनं पदकाच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दुपारच्या सत्रात कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक नावावर केले. त्यानंतर सायंकाळी नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी केली. भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरयाणा सरकारनं त्याला ६ कोटी बक्षीस देण्याची घोषणा केली. BCCI नेही टोकियोतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा केली. ( Haryana announces Rs 6 cr for Neeraj; Punjab CM hails golden boy)
नीरज चोप्रानं सुवर्ण पदकासह पाकिस्तानच्या अर्षद नदीमलाही लोळवलं, बघा कितव्या स्थानावर फेकलं!
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर ( Haryana Chief Minister Manohar Lal Khattar ) यांनी नीरज चोप्राचे कौतुक केले. ते म्हणाले, या सुवर्णक्षणाची देशवासीयांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती आणि संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे. नीरज चोप्रानं इतिहास घडवला.''
नीरजने आज सुवर्णपदक जिंकून भारताला टोकियोत एकूण ७ वे पदक जिंकून दिले. टोकियोत वेटलिफ्टर मीराबाई चानूनं रौप्यपदक जिंकून पदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ कुस्तीपटू रवी कुमार दहिया ( रौप्य), बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, भारतीय पुरुष हॉकी संघ, बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोईन व कुस्तीपटू बजरंग पुनिया ( सर्वांनी कांस्य) यांनी पदकाची कमाई केली. भारतीय संघ ४७व्या क्रमांकावर आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस रक्कमेची घोषणा केली. बीसीसीआय सुवर्णपदक विजेत्या नीरजला १ कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई व रवी दहिया यांना प्रत्येकी ५० लाख, कांस्यपदक विजेते पी व्ही सिंधू, लवलिना बोरगोईन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी २५ लाख व भारतीय पुरूष हॉकी संघाला १.२५ कोटी रुपये देणार आहे. ( The BCCI announces prize money of 1cr for Indian Olympic Gold Medalist Neeraj Chopra.)
- केंद्र सरकारकडून ७५ लाख
- हरयाणा सरकारकडून ६ कोटी
- पंजाब सरकारकडून २ कोटी
- मनिपूर सरकारकडून १ कोटी
- बीसीसीआयकडून १ कोटी
- चेन्नई सुपर किंग्सकडून १ कोटी