Tokyo Olympic, Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. २३ वर्षीय भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. त्यानं पहिल्या दोन प्रयत्नात ८७ मीटर अंतर पार केले अन् प्रतिस्पर्धी त्याच्या जवळपासही पोहोचले नाही. प्रजासत्ताकचे जाकूब व्हॅद्लेजच ( ८६.६७ मीटर) आणि व्हिटेझस्लॅव्ह ( ८५.४४ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.
हरयाणा सरकारकडून नीरज चोप्राला ६ कोटी; बीसीसीआयनं पदकविजेत्यांसाठी उघडला खजिना!
मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोडक्यात ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. फोटो फिनिशमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मॅलकॉल्म स्पेन्सने कांस्यपदक जिंकले. अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूला पोडियम ( अव्वल तिघांत) फिनिशमध्ये पाहण्यासाठी १२५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. या ऐतिहासिक विजयानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी नीरजला स्पेशल गिफ्ट देण्याचे जाहीर केले.
नीरज चोप्रानं सुवर्ण पदकासह पाकिस्तानच्या अर्षद नदीमलाही लोळवलं, बघा कितव्या स्थानावर फेकलं!
एका ट्विटर युजरनं आनंद महिंद्रा यांना नीरजला Xuv700 गिफ्ट देण्याची मागणी केली. त्यावर महिंद्रा यांनी रिप्लाय दिला अन् त्यांनी त्यांच्या कंपनीतील दोन व्यक्तींना टॅग करून नीरजसाठी Xuv700 गिफ्ट म्हणून तयार करण्यास सांगितले.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही नीरजला २ कोटींचे बक्षीस जाहीर केले.