नवी दिल्ली - ऑलिम्पिकमध्ये आज भारत आणि बेल्जियम यांच्यात हॉकी सेमीफायनलचा रोमांचक सामना होत आहे. प्रत्येक भारतीयाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत आणि विजयाची प्रार्थना करत आहेत. त्यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. (Tokyo olympic 2020 PM Narendra modi tweets watching india vs belgium hockey mens semi final)
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे, 'मी टोकियो ओलिम्पिकचा भारत विरुद्ध बेल्जियम हॉकी मेंस सेमीफायनल पाहात आहे. मला आपला संघ आणि संघाच्या कौशल्याचा अभिमान आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा'
2-2 ची बरोबरीत सामना -पुरुष हॉकी सेमीफायनलमध्ये भारत आणि बेल्जियम यांच्यात काट्याची टक्क सुरू आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियमविरुद्ध जबरदस्त सुरुवात केली आहे आणि सुरुवातीच्याच 8 मिनिटांत बेल्जियमविरुद्ध दोन गोल केले. पहिल्या सत्रात भारताने 2-1 ने बेल्जियमवर आघाडी घेतली होती. मात्र, तर दुसऱ्या सत्रात बेल्जियमने 12व्या मिनिटाला गोल करत 2-2 ची बरोबर केली आहे.