शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Tokyo Olympic, Hockey : भारतीय महिला हॉकी संघाची 'सुवर्ण' घोडदौड अर्जेंटिनानं रोखली; आता कांस्यसाठी लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 5:04 PM

Tokyo Olympic, Hockey : पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत अपयश आल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाकडून अपेक्षा उंचावल्या होत्या.

Tokyo Olympic, Hockey : पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत अपयश आल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. फिनिक्स भरारीप्रमाणे भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यांच्यासमोर बलाढ्य अर्जेंटिनाचे आव्हान होते, तरीही भारतीय महिला संघानं कडवी झुंज दिली. १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी चौथे स्थान पटकावले होते. त्यानंतरची ही महिला संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय महिला संघानं उपांत्य फेरीचा हा सामना गमावला असला तरी त्यांना कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. ( Indian women's hockey team lose against Argentina in the semifinal match, to take on Great Britain in bronze medal clash) 

राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ३६ वर्षांनंतर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली होती आणि त्याच संघानं आता पाच वर्षांनी थेट उपांत्य फेरीत धडक देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ४१ वर्षांपूर्वी भारतीय महिला संघ चौथ्या स्थानावर राहिला होता आणि ती त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. पण, अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासमोर बलाढ्य अर्जेंटिनाचे आव्हान होते. अर्जेंटिनाच्या महिला संघाने सिडनी २००० आणि लंडन २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.  साखळी स्पर्धेतील अखेरच्या दोन सामन्यांनंतर भारतीय महिला संघाचा उंचावलेल्या आत्मविश्वासानं अर्जेंटिनालाही पहिल्या सत्रात बॅकफूटवर टाकले. दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत सिंगनं गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. या गोलनं भारतीय खेळाडूंचे मनोबल आणखी उंचावले अन् त्यांनी अर्जेंटिनाचे आक्रमण यशस्वीरित्या थोपवून लावले. पहिल्या १५ मिनिटांत अर्जेंटिनाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले अन् गोलरक्षक सवितानं हे अयशस्वी ठरवले. भारतानं पहिल्या १५ मिनिटांत १-० अशी आघाडी कायम राखली. (India leading 1-0 at end of 1st quarter | Semis | Vs Argentina)  दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनानं आक्रमणाची धार अधिक तीव्र करताना भारताच्या डी सर्कलवर हल्लाबोल केला अन् १८व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर त्यांना बरोबरी मिळवण्यात यश आलं. बारीओनेएव्होनं हा गोल केला. भारतीय खेळाडूंसाठी हा वेक अप कॉल होता. वंदना कटारियानं अर्जेंटिनाची बचावभींत भेदून चेंडू डी सर्कलपर्यंत नेला, परंतु त्याला अंतिम स्वरूप देता आले नाही. अर्जेंटिनाच्या महिलांकडूनही आक्रमक खेळ झाला. पण, गोलरक्षक सविता अभेद्य भींतीसारखी त्यांच्यासमोर उभी राहिली. 

अर्जेंटिनाकडून सातत्यानं होत असलेले आक्रमण पाहून भारतीय संघाचे मनोबल जराही खचले नाही. सलिमा टेटेनं भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला, परंतु आघाडी घेता आली नाही. पुढच्याच मिनिटाला आणखी एक कॉर्नर मिळाला पण ताळमेळ चुकल्यानं ही पण संधी वाया गेली. भारतानं मध्यांतरापर्यंत १-१ अशी बरोबरी कायम राखली. ( Argentina threw everything at India in Q2 but the game is still level. 1-1 it is) तिसऱ्या सत्रात अर्जेंटिनानं पेनल्टी कॉर्नवर गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. बारीओनेएव्होनं हा गोल केला. यानंतर भारतीय महिलांचे मनोबल खचलेले दिसले. त्या प्रयत्न करत होत्या, परंतु त्याला अंतिम स्वरूप देण्यात कमी पडत होत्या. तिसऱ्या सत्रात अर्जेंटिनानं २-१ अशी आघाडी कायम राखली. ( India trailing 1-2 at end of 3rd quarter) 

चौथ्या सत्रात भारतीय खेळाडूंकडून सातत्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. सामना संपण्यास १० मिनिटांचा खेळ शिल्लक असताना भारताला बरोबरीचा गोल करण्यासाठी पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण, अर्जेंटिनाच्या गोली मारियानं तो हाणून पाडला. आता अर्जेंटिना चेंडूवर ताबा ठेऊन सावध खेळ करण्यातच आनंदी होता. भारतीय खेळाडूंना ते चेंडू मिळवूनच देत नव्हते. त्यामुळे भारतीय संघाला हार मानणे भाग पडले.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Hockeyहॉकी