Tokyo Olympic, Hockey : तमाम भारतीयांना पुन्हा हॉकीच्या प्रेमात पाडणारा हा क्षण... १९८०नंतर भारतीय संघ ऑलिम्पिक पदकाच्या नजीक जाणार असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कोट्यवधी भारतीयच नव्हे तर शेजारील पाकिस्तानातील हॉकी समर्थकही टीम इंडियाला चिअर करण्यासाठी टीव्ही समोर नक्की बसले होते. भारतीय पुरुष हॉकी संघानं एक काळ ऑलिम्पिक गाजवला होता आणि तोच काळ पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला होता... भारतीय पुरूष हॉकी संघानं उपांत्य फेरीच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमनला झुंजवले. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी तुल्यबळ खेळ केला, परंतु पन्हा एकदा अखेरच्या सत्रात चुका करताना पिछाडी ओढावून घेतली अन् तिच महागात पडली. भारतानं २-० अशा आघाडीवरून हा सामना गमावला. भारतीय हॉकी संघाचे सुवर्णस्वप्न भंगले असले तरी कांस्यपदक जिंकण्याची त्यांना संधी आहे. ( Congratulations to Belgium for making their second consecutive finals)
पहिल्या सत्रात वर्चस्व... वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमनं दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवून लॉकी लूयपाएर्टच्या गोलच्या जोरावर १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाकडून आक्रमक खेळ सुरू झाला. बेल्जियमच्या डी मध्ये आक्रमण केले, त्याचे फळ मिळाले अन् सातव्या मिनिटाला टीम इंडियाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तो अपयशी ठरला, परंतु पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगनं गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगनं रिव्हर्स फटका मारून अप्रतिम मैदानी गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ११व्या मिनिटाला भारताला कॉर्नरवर गोल करून आघाडी मिळवण्याची संधी होती, परंतु रुपिंदर पाल सिंगचा तो गोल बेल्जियमच्या गोलरक्षकानं अडवला. आक्रमकतेसोबतच भारताच्या बचावपटूंनीही सुरेख कामगिरी करताना पहिल्या सत्रात २-१ अशी आघाडी कायम राखण्यात हातभार लावला. ( Indian men's hockey team takes 2-1 lead against Belgium after the end of the first quarter )
अखेरची १५ मिनिटं...भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग याला पहिल्याच मिनिटाला ग्रीन कार्ड मिळाले आणि त्यामुळे भारताला १० खेळाडूंसहच खेळावे लागले. त्यात पुढच्या मिनिटाला बेल्जियमनं पेनल्टी कॉर्नर मिळवला, त्यांचा पहिला प्रयत्न अमित रोहिदासनं हाणून पाडला. बेल्जियनं सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळवून भारतीय संघावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला अन् त्यांना यश मिळालं. हेंड्रीक्सनं तिसऱ्या प्रयत्नात गोल करून बेल्जियमनला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. आघाडी मिळवल्यानंतर बेल्जियमनं चेंडूवर ताबा राखण्यावर भर दिला अन् हा संघ त्यात तरबेज आहे. दबावाखाली गेलेल्या भारतीय खेळाडूंना बेल्जियमच्या आक्रमणपटूंनी चूक करण्यास भाग पाडले. पण, बेल्जियमनला सलग गोन कॉर्नर मिळूनही गोल करता आले नाही. बेल्जियमनं पुन्हा सलग दोन कॉर्नर मिळवले तेही भारतीय बचावपटूंनी रोखले. पण, ५३व्या मिनिटाला बेल्जियमला स्ट्रोक्स मिळाला अन् हेंड्रीक्सनं गोल करून आघाडी ४-२ अशी भक्कम केली. आता अखेरच्या ७ मिनिटांत भारताला आव्हान कायम राखण्यासाठी दोन गोल करणे गरजेचे होते अन् ते अशक्य आव्हान भारताला पेलवलं नाही. बेल्जियमनं हा सामना ५-२ असा जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. ( Belgium have been relentless with their attack. India have been put under pressure in Q4)
भारताचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास...
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतसुवर्णपदक - १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४, १९८०रौप्यपदक - १९६०तिसरे स्थान - १९६८, १९७२