Tokyo Olympic : टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, तिरंदाजी, नेमबादी, जिमनॅस्टीक्स आदी खेळांमध्ये तर मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू यंदा पहिल्या-दुसऱ्या फेरीत बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जागतिक नेमबाजी स्पर्धेत पदकांची लयलुट करणारे भारतीय नेमबाज ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर लगेच टीका होताना दिसत आहेत. वर्ल्ड कपमध्ये जिंकता मग इथे का नाही, असा प्रश्न करणारे मीम्स सोशल मीडियावर १९ वर्षीय मनू भाकेरच्या नावानं व्हायरल झाले आहेत. पण, ज्यांना असं वाटतं की ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं 'खाऊ' आहे त्यांनी एकदा हा व्हिडीओ पाहाच.
Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का?
दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू हा तितक्याच ताकदिनं, अफाट इच्छाशक्ती आणि प्रबळ निर्धार घेऊन मैदानावर उतरतो. पदक जिंकण्याच्या ओझ्यासह कोट्यवधी देशवासीयांच्या अपेक्षांचे दडपणही त्यानं खांद्यावर घेतलेले असते. अशात एक चूकही महागात पडू शकते, हा सततचा दबाव त्याच्या मनात सुरू असतो. त्याक्षणी जो खेळाडू या दडपणाला झुगारून लावतो, तो बाजी मारतो.. पण, म्हणून आपले खेळाडू वाईटच खेळले असा अर्थ होत नाही.
पाहा व्हिडीओ...