Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) च्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम (Mary Kom) हिला पराभवाचा धक्का बसला. खरेतर मेरी कोमने विजय झाल्याचे मानत हात वर केला होता, पण अंपायरांच्या निर्णयामुळे तिला धक्का बसला. मॅचनंतर मेरी कोमने अंपायरांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. (Mary Kom reaction after match to PTI was shocking; questioning on Judge's decision in Tokyo Olympic match.)
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इंग्रीट लोरेना व्हेलेंसिया व्हिक्टोरियाला कडवी टक्कर देऊनही मेरीला हा पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे दुःख बाजूला ठेऊन ३८ वर्षीय मेरीन खिलाडूवृत्ती दाखवली आणि निकालानंतरच्या तिच्या कृतीचं सर्वांकडून कौतुक होत आहे.
Tokyo Olympic, Mary Kom : मेरी कोमनं पराभवही मोठ्या मनानं स्वीकारला, निकालानंतर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक!मेरी कोम आणि इंग्रिट यांच्यात अंपायरांनी विभागणी करत निर्णय दिला. दोन जजनी मेरी कोमच्या बाजुने तर दोन जजनी इंग्रिटच्या बाजुने निर्णय दिला. खरेतर मेरी कोमने रिंगमध्ये विजेत्याची घोषणा करण्याच्या आधी आपला हात वर केला होता. परंतू इंग्रिटला विजयी घोषित करण्यात आल्याने तिला धक्का बसला.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मेरी कोमने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्सर संघटनेवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. माहित नाही काय गडबड आहे, आयओसीसोबत काय समस्या आहे. मी हा निर्णय अजिबात समजू शकलेले नाहीय. मी स्वत: त्यांची एक सदस्य राहिलेली आहे. त्यांनी नेहमी एकाच बाजुचा विचार केला आहे. माझ्याकडून यावर सल्लेदेखील देण्यात आले होते. मात्र, माझ्यासोबत न्याय करत आला नाही, असे मेरी कोम म्हणाली.
मी हरल्यावर मला खूप वेळ विश्वासच बसला नाही. मीच जिंकलेय असे वाटत होते. रिंगमध्ये मी आनंदी होते. मॅच संपल्यानंतरही वाईट वाटले नव्हते. माझ्या मनाला माहिती होते मी मॅच जिंकलेय, पण जेव्हा सोशल मीडिया आणि कोचला पाहिले तेव्हा मला मी मॅच हरल्याचे जाणवले. मी या निर्णयाला आव्हान देऊ शकत नाही, परंतू मला विश्वास आहे जगाने सत्य पाहिले असेल, अशा शब्दांत मेरीने नाराजी व्यक्त केली आहे.