Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघापाठोपाठ महिलांनीही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला. १९८०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहा संघांमध्ये भारतीय महिला संघ चौथ्या क्रमांकावर राहिला होत. तेव्हा उपांत्य फेरीचे सामने झाले नव्हते. ४१ वर्षांनी प्रथमच भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर अर्जेंटिनाचे आव्हान आहे. भारतीय महिला संघाचा हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक असताना या संघातील प्रमुख खेळाडू सलिमा टेटे ( Salima Tete) हिच्या कुटुंबीयांना व गावाकऱ्यांना हा सामना लाईव्ह पाहता येणार नाही. यापेक्षा टेटे कुटुंबीयांसाठी दुसरे दुर्भाग्य काही असूच शकत नाही.
Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या प्रविण जाधवच्या कुटुंबीयांना मिळतेय धमकी
झारखंडच्या बडकिचपार गावातल्या सलिमानं जगाच्या नकाशावर गावाचे नाव गाजवले. पण, ती ज्या गावात लहानाची मोठी झाली, ना तिथे कोणाच्या घरी टिव्ही आहे ना इंटरनेट कनेक्शन... ४५ कुटुंबायांच्या या गावात नेटवर्क म्हणजे ना च्या बरोबरच. त्यामुळे उद्या जेव्हा जग भारतीय महिला हॉकी संघाचा खेळ लाईव्ह पाहत असेल, तेव्हा सलिमाच्या घरच्यांना मात्र कुठून तरी निकाल कळेल, याची प्रतीक्षा पाहावी लागले.