शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Tokyo Olympic : पी व्ही सिंधूनं कांस्य जिंकून इतिहास रचला, पण अजूनही सायना नेहवालनं अभिनंदन करणारा मॅसेज नाही केला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 5:34 PM

भारताची स्टार बॅडमिंटनपटून पी व्ही सिंधू हिनं सोमवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.

भारताची स्टार बॅडमिंटनपटून पी व्ही सिंधू हिनं रविवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. तिनं कांस्यपदकाची कमाई करताना सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान पटकावला. सिंधूनं कांस्यपदक जिंकल्यानंतर मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी तिचे कौतुक केले, परंतु वरिष्ठ खेळाडू सायना नेहवालनं अजूनही सिंधूला अभिनंदन करणारा मॅसेज केलेला नाही. सिंधूनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. 

कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूनं चीनच्या बिंग जिओ विरुद्धच्या सामन्यात २१-१३, २१-१५ असा खणखणीत विजय प्राप्त करत पदकावर नाव कोरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे सलग दोनवेळा भारतासाठी ऑलिम्पिक पदकाची कमाई करणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. टोकियोतील ऐतिहासिक कामगिरीनंतर सिंधूला विचारण्यात आले की, गोपिचंद आणि सायना यांनी तुझे अभिनंदन केले का? त्यावर सिंधू म्हणाली, हो गोपी सरांनी माझे अभिनंदन केले. मी अजून सोशल मीडिया पाहिलेला नाही. हळुहळू मी सर्वांचे आभार मानेन. गोपी सरांनी मला मॅसेज पाठवला, परंतु सायनाने नाही. आम्ही जास्त बोलतही नाही.''

मागील वर्षी सिंधू तीन महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी लंडनमध्ये गेली होती आणि त्यानंतर तिच्यात व गोपिचंद यांच्यात वाद झाल्याचे वृत्त समोर आले. आपण रिकव्हरी आणि न्यूट्रिशन प्रोग्रामसाठी लंडनला गेल्याचे सिंधूनं त्यानंतर सांगितले. पण, तेथे तिनं  गोपिचंद अकादमीत नव्हे तर पार्क तेई-सांग यांच्या मार्गदर्शनाखाली गचीबाऊली इंडोर स्टेडियममध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्या व गोपिचंद यांच्या वादाच्या वृत्तांना बळ मिळाले. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021PV Sindhuपी. व्ही. सिंधूSaina Nehwalसायना नेहवाल