Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघानं शुक्रवारी यजमान जपानला पराभूत करून अ गटात १२ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले. ४१ वर्षांनंतर टीम इंडियानं प्रथमच साखळी फेरीत चार विजय मिळवण्याचा पराक्रम करून दाखवला. ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक केले आणि सलग तीन विजयांची नोंद केली. आजच्या अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी जपानवर ५-३ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय पुरुष संघ ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवणार अशा आशा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंगा सोढी यांनी मोठी घोषणा केली.
५१व्या मिनिटाला निळकंट शर्मानं मैदानी गोल करून भारताची आघाडी ४-२ अशी मजबूत केली. त्यानंतर कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगच्या स्टीक्समधून आलेल्या चेंडूला गुरजंत सिंगन दिशा दाखवून ५-२ अशी दमदार आघाडी घेतली. गुरजंतचा हा सामन्यातील दुसरा गोल ठरला. ५९व्या मिनिटाला जपानकडून काजुमा मुराटानं गोल कडून पिछाडी ३-५ अशी कमी केली.