Mirabai Chanu, Tokyo Olympics: भारताच्या २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं टोकिया ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक जिंकून भारताला दमदार सुरुवात करून दिली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. मीराबाईच्या पदकानंतर संपूर्ण भारतात आनंद व्यक्त केला जात आहे. मीराबाईनं जगात देशाचं नाव उज्ज्वल केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर मीराबाई चानूच्या भावना जाणून घेण्याचीही उत्सुकता सर्वांना होती. मीराबाई हिनं 'भारत माता की जय'चा जयजयकार करत आपलं स्वप्न पूर्ण झाल्याची व्यक्त केली आहे. (Tokyo Olympics 2020: I am very happy, was dreaming of this for past five years, Mirabai Chanu says after winning silver medal)
प्रशिक्षणासाठी २२ किमीचा रोजचा प्रवास अन् डिप्रेशनवर मात!, मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास
"मी खूप खूष आहे की मला पदकाची कमाई करता आली. संपूर्ण देश मला पाहत होता आणि माझ्याकडून पदकाची देशवासियांना अपेक्षा होती. त्यामुळे मी थोडी नर्व्हस होते. मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची होती आणि यासाठी मी खूप मेहनत घेतली", असं मीराबाई म्हणाली.
"सूवर्णपदकाची कमाई करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. ते शक्य होऊ शकलं नाही. पण मी पुरेपूर प्रयत्न केले. जेव्हा दुसरे लिफ्टिंग पूर्ण झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण पदकाचे मानकरी झालो आहोत. अखेर गेल्या ५ वर्षांपासूनचं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं यााच मला खूप आनंद आहे", असंही मीराबाई म्हणाली.