शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

Tokyo Olympics: तिरंदाज प्रवीण जाधव याच्या घरावर जेसीबी फिरवण्याची धमकी; घरच्यांची गाव सोडण्याची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 3:18 PM

 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघातील सदस्य प्रवीण जाधव हा देशाला पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्याच्या गावातील शेजाऱ्यांकडून धमकी मिळत आहे.

 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघातील सदस्य प्रवीण जाधव हा देशाला पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्याच्या गावातील शेजाऱ्यांकडून धमकी मिळत आहे. त्याचं घर जेसीबी पाडण्याची धमकी शेजाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. प्रवीणचे वडील रमेश या वादाला एवढे कंटाळले आहेत की, त्यांनी हा वाद असाच सुरू राहिला तर गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. ( Archer Jadhav's parents say land dispute may force them to leave village)

प्रवीणचे आई-वडील, काका आणि चुलत भाऊ सातारा जिल्ह्यातील सरडे गावात राहतात. येथे त्यांचा दोन खोलींचं छोटंस घर आहे. प्रवीणचे वडील गावात मजूरी करतात. प्रवीण भारतीय सैन्यात काम करत असल्यानं घराची परिस्थिती सुधारली आहे. अशाच प्रवीणच्या वडिलांना घराचं काम करायचं आहे, परंतु शेजारी त्यांना बांधकाम करण्यास देत नाही. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही त्यांची जागा आहे. प्रवीणच्या कुटुंबीयांनी घर मोठं बांधल्यास रस्ता आणखी छोटा होईल, असा त्यांचा दावा आहे. पण प्रवीणच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

प्रवीणचे म्हणणे काय?हरियाणा येथे सराव करीत असलेल्या प्रवीण जाधव यांनी तेथे पत्रकारांना दिलेल्या माहितीत सांगितले, की सरडे (ता. फलटण) गावातील एका कुटुंबातील पाच ते सहा लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी माझी आई-वडील व काका-काकूंना धमकावण्यास सुरुवात केली. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार असल्याने त्यांनी आम्हाला विरोध दर्शविला आहे. माझ्या कुटुंबीयांना खूप त्रास होत असून मी तिथे त्यांच्या सोबत नाही. याबाबत मी लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललोय. 

जाधव यांच्या कुटुंबातील चार सदस्य झोपडीत राहत होते. मात्र, प्रवीण सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले आहे. याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. शेजाऱ्यांना घरापुढून एक वेगळा मार्ग हवाय. त्यावर त्यांना प्रवीणच्या कुटुंबीयांनी होकारही दिला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा धमकावण्यास सुरुवात केलीय. याप्रकरणी कुटुंबीयांनी सातारा जिल्ह्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते.

ऑलिम्पिकमधून परतल्यावर भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू थेट हरियाणातील सोनिपथ येथे गेले असून तिथे ते पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सराव करणार आहेत.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Maharashtraमहाराष्ट्रsatara-acसातारा