Tokyo Olympics, Praveen Jadhav and Praveen Jadhav: टोकियो ऑलिम्पिमकमध्ये तिरंदाजांनी दमदार सुरूवात केली आहे. महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधव (Praveen Jadhav) आणि दीपिका कुमारी (Deepika Kumari) या जोडीनं मिश्र गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या जोडीनं चायनीज तायपे चिया लिन आणि चिह चून तांग यांच्या विरुद्ध लढत जिंकली. (Tokyo Olympics: Deepika Kumari, Pravin Jadhav reach the quarter-final of Archery Mixed Team Event)
चायनीज तायपे जोडीनं पहिला ३६-३५ नं जिंकला होता. त्यामुळे दोन पॉइंट त्यांच्या खात्यात जमा झाले होते. दुसरा सेट ३८-३८ असा बरोबरीत सुटला. दुसऱ्या सेटनंतर तायपे जोडीकडे ३-१ अशी आघाडी होती. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत प्रवीण-दीपिका जोडीनं ४५-३५ अशा फरकानं सेट जिंकला. सामना देखील ३-३ असा बरोबरीत आणला. चौथ्या आणि शेवटच्या सेटमध्ये भारतीय जोडीनं लौकिकाला साजेशी कामगिरी करत ३७-३६ असा विजय प्राप्त केला. भारतीय जोडीनं या सेट जिंकत सामना देखील ५-३ अशा फरकानं खिशात घातला.