शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

Tokyo Olympics : संपूर्ण देशात मीराबाई चानूच्या नावाचाच डंका; जाणून घ्या, काय म्हणाले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 3:18 PM

Mirabai Chanu success in Tokyo olympics : मीराबाई चानूच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूने मेडल जिंकताच संपूर्ण देशात आंदाचे वातावरण आहे आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच बरोबर ऑलिम्पिक खेळाडूंकडून देशाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने आज झालेल्या 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. (Tokyo olympics Mirabai Chanu success in olympics will inspire everyone PM Narendra Modi and president Ramnath Kovind congratulated)

मीराबाई चानूच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. मीराबाई चानूचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे, की ‘मीराबाई चानूच्या शानदार प्रदर्शनामुळे देशात उत्साहाचे वातावरण आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचे यश प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेरणा देईल.’

Mirabai Chanu, Tokyo Olympics: 'स्वप्न पूर्ण झालं...भारत माता की जय!', रौप्यपदक विजेत्या मीराबाईची चानूची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मीराबाई चानूचे अभिनंद करताना म्हटले आहे, वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकूण टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये भारतासाठी पदक तालिकेची सुरुवात केल्याबद्दल मीराबाई चानूचे हार्दिक अभिनंदन.

संघर्षाचं पदक -मणिपूरच्या मीराबाईनं आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. मीराबाईला वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन प्रशिक्षण केंद्रात जावं लागायचं. तिथून आल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास यातच संपूर्ण दिवस निघून जायचा.

Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video : देवाचा धावा, मनातली धाकधूक अन् मीराबाईच्या कुटुंबीयांचा एकच जल्लोष

...तेव्हा मनात आला होता वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचा विचार आता रचला इतिहास - मीराबाईचं गाव इम्फाळपासून २२ किमी दूरवर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली होती. कारण याकाळात ती नैराश्याचा सामना करत होती. वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. पण नैराश्यावरही मात करुन मीराबाईनं दमदार पुनरागन केलं आणि आज टोकियोमध्ये इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी मीराबाई दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यासोबतच वेटलिफ्टिंमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी देखील ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं कांस्य पदकाची कमाई केली होती. 

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदIndiaभारत