टोकियो : तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली. नीरज चोप्रा याने भालाफेकीत सुवर्ण फेक करत भारताला अॅथलेटिक्स फील्ड अॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारतासाठी हा दिवस सुवर्ण उत्सवी ठरला. दुसरीकडे कुस्तीत सुवर्ण पदकाची संधी हुकल्यानंतर बजरंग पुनियाने कांस्य पदकावरील पकड अजिबात ढिली केली नाही. यामुळे भारतासाठी शनिवारचा दिवस अत्यंत जल्लोषाचा ठरला.नीरजने इतर खेळाडूंना दिली नाही एकही संधीअंतिम फेरी सहापैकी दुसरा प्रयत्न सर्वोत्तमपहिला ८७.०३ मीटरदुसरा ८७.५८ मीटरतिसरा ७६.७९ मीटर चौथा फाऊलपाचवा फाऊलसहावा ८४.२४ मीटरऐतिहासिक कामगिरी २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावले होते. नीरजने बिंद्राच्या कामगिरीशी बरोबरी करताना तो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा दुसरा भारतीय ठरला.महाराष्ट्राशी नाते! रोड मराठा समाजातील युवकाने मिळवून दिले जगज्जेतेपदनागपूर : नीरज चोप्रा याने टोकिओत सुवर्णपदक जिंकले आणि हरयाणा, दिल्लीत नीरज चोपडे यांचे अभिनंदन, असे संदेश सुरू झाले. त्याचे कारण पानिपतजवळच्या खंदरा गावचा रहिवासी असलेल्या नीरज चोप्राचे मूळ महाराष्ट्रात आहे. १७६४ च्या तिसऱ्या पानिपत युद्धातून वाचलेले सगळ्या जाती-समाजाचे लोक हरयाणात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. सोनीपत, पानीपत, कुरूक्षेत्र, कर्नाल, कैथल आणि जिंद या सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राणे, भोसले, चोपडे, मुळे, महले वगैरे आडनावे असलेला हा समाज राहतो. शेती, दुग्धउत्पादन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. नीरजचे कुटुंबही शेतीव्यवसायातच आहे. २०१५ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नवा विक्रम नोंदविल्यापासून प्रत्येक मुलाखतीत तो रोड मराठा समाज व कुटुंबांच्या शेती व्यवसायाचा आवर्जून गौरवाने उल्लेख करीत आला आहे.रोड मराठा समाज पंधरा वर्षांत अ. भा. मराठा जागृती मंच नावाने संघटित झाला आहे. पुरूषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्त्वातील मराठा सेवा संघ, संभाजी व जिजाऊ ब्रिगेडच्या मदतीने दिल्ली, पानीपत येथे मोठे कार्यक्रम होतात. त्याचे प्रमुख पदाधिकारी कमलजीत महले ‘लोकमत’शी बोलताना नीरजच्या यशाने आनंदून गेले होते. ते म्हणाले की, सहा अर्जुन पुरस्कारविजेते दिल्याचा रोड मराठा समाजाला अभिमान आहे.नीरजवर बक्षिसांचा वर्षावहरयाणा सरकारकडून ६ कोटी रुपयांचा रोख पुरस्कारहरयाणा सरकारमध्ये क्लास वन अधिकाऱ्याची नोकरीजमीन खरेदीसाठी ५०% सूट नीरजचे शहर पंजकूला येथे क्रीडा केंद्र उभारणार
Tokyo Olympics: सुवर्ण उत्सव! शेवटचा दिस ‘गोल्ड’ झाला; नीरजने इतिहास घडवला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 6:02 AM