नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनणारी पी.व्ही. सिंधू हिने आपले पुढचे लक्ष्य निश्चित केले आहे. तिला यावर्षी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद कायम राखायचे आहे. तिने सांगितले की, ‘स्पेनमध्ये विश्व चॅम्पियनशिप होणार आहे. त्यात चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे.’रविवारी २६ वर्षांच्या पी. व्ही. सिंधू हिने सांगितले की, ‘मी अजून कांस्य पदकानंतरच्या भावनांमधून बाहेर येऊ शकलेली नाही. मी त्याचा आनंद घेत आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे नक्कीच इतरांना प्रेरित करेल. लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होतील. तसेच स्पेनमध्ये विश्वचॅम्पियनशिपदेखील होणार आहे. त्यात चांगला खेळ करेल, अशी अपेक्षा आहे. मी निश्चितपणे २०२४ ऑलिम्पिक खेळेल. मात्र त्याला वेळ आहे.’
मी आधीच आश्वासन दिले होते की, मी काही नवे कौशल्य आणि स्ट्रोक्स दाखवेल. मला आनंद आहे की मी ते ऑलिम्पिकमध्ये दाखवू शकली. मी प्रशिक्षक पार्क यांची आभारी आहे. आम्ही तंत्रावर खूप मेहनत घेतली.’- पी.व्ही. सिंधू
सिंधु भारताची सर्वोत्कृष्ठ ऑलिम्पियन - ठाकूरशटलर पी. व्ही. सिंधु ही भारताची सर्वोत्कृष्ठ ऑलिम्पियन खेळाडू असल्याचे वक्तव्य केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, ‘सिंधू भारताची आयकॉन आहे. तिचे खेळातील योगदान अतुलनीय आहे. सिंधू भारतातील येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.’