शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Tokyo Olympics: ‘त्या’ म्हणतात, ‘पैसा’ नको, ‘प्रेशर’ही नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 5:56 AM

Tokyo Olympics Update: मोठ्या कंपन्या बऱ्याचदा खेळाडूंवर परफॉर्मन्सची सक्ती करतात. वर्षात किमान इतक्या मॅचेस  खेळल्याच पाहिजेत, त्यात किमान इतकी पदकं मिळवलीच पाहिजेत, यासाठी खेळाडूंवर प्रचंड प्रमाणात दबाव आणला जातो. स्त्री खेळाडूंनी मूल जन्माला घालू नये यासाठी त्यांच्यावर बळजबरी केली जाते.

विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल... यासारख्या दिग्गज खेळाडूंना एका जाहिरातीचे किती पैसे मिळतात? प्रायोजक त्यासाठी किती पैसा ओततात आणि खेळाडूंना किती मालामाल करतात? जगभरातील मोठ्या कंपन्या दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी आपला ‘ब्रॅण्ड ॲम्बेसेडर’ म्हणून अक्षरश: लक्षावधी, कोट्यवधी रुपये ओततात.. त्याबद्दल सगळ्यांना या खेळाडूंचा हेवा वाटतो, पण या कंपन्या काय गंमत म्हणून त्यांच्यावर एवढा पैसा खर्च करतात? त्याबदल्यात त्यांना ‘रिझल्ट’ही हवा असतो. खेळाडूंनी मॅचेस जिंकल्याच पाहिजेत, ते कायम चर्चेत असलेच पाहिजेत, अशी अलिखित (काही वेळा अगदी लिखितही) सक्तीदेखील असते. खेळाडूंना आपल्या कामगिरीपेक्षा आपली कामगिरी कशी होईल याचीच धास्ती त्यामुळे जास्त असते. अनेक महिला ॲथलिट‌्सनी आता याविरुद्ध आवाज उठवताना, या कंपन्यांना रामरामही ठोकायला सुरुवात केली आहे. ‘तुमचा पैसा नको आणि तुमचं ‘प्रेशर’ही नको, म्हणून मोठ्या कंपन्यांशी जोडलं जाण्यापेक्षा लहान कंपन्यांना पसंती देणं सुरू केलं आहे.मोठ्या कंपन्या बऱ्याचदा खेळाडूंवर परफॉर्मन्सची सक्ती करतात. वर्षात किमान इतक्या मॅचेस  खेळल्याच पाहिजेत, त्यात किमान इतकी पदकं मिळवलीच पाहिजेत, यासाठी खेळाडूंवर प्रचंड प्रमाणात दबाव आणला जातो. स्त्री खेळाडूंनी मूल जन्माला घालू नये यासाठी त्यांच्यावर बळजबरी केली जाते. खेळाडूंची कामगिरी चांगली झाली नाही किंवा त्या गर्भवती झाल्या तर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं जातं किंवा त्यांचे पैसेही कमी केले जातात. हेच खेळाडूंना आता नकोसं झालं आहे.अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स सध्या बरीच चर्चेत आहे. मानसिक कारणावरून यंदाच्या ऑलिम्पिकमधून ऐनवेळी तिनं माघार घेतली. तिचं म्हणणं अनेकांनी उचलून धरलं, पण मुख्य म्हणजे तिला प्रायोजित करणाऱ्या ‘ॲथलिटा’नं लगोलग जाहीर केलं, “आम्ही सिमोनच्या भावनांचा आणि निर्णयाचा आदर करतो. ती स्पर्धेत भाग घेणार नसली, तरीही आम्ही कुठल्याही प्रकारे तिचं मानधन किंवा इतर सुविधा कमी करणार नाही!” ‘गॅप इन्कॉर्पोरेशन’ ही तुलनेनं तशी छोटी कंपनी. ‘ॲथलिटा’ या ब्रॅण्डनेमनं महिला आणि मुलींसाठी विविध कपडे बनविले जातात. काही दिवसांपूर्वीच सिमोननं एका बड्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करून या कंपनीला पसंती दिली होती. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.२०१६च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतलेल्या अलेक्सी पापाज या धावपटूनं एका मोठ्या कंपनीबरोबरचा करार रद्द करून ‘चॅम्पियन’ या कंपनीबरोबर संबंध जोडले. मेरी केन या धावपटूनंही बड्या कंपनीला रामराम ठोकून बोस्टनमधील ‘ट्रॅकस्मिथ’ या छोट्या कंपनीला पसंती दिली. मेरी सांगते, “या कंपनीच्या ‘कोच’नं वजन कमी करण्यासाठी माझ्यामागे इतका लकडा लावला की त्यामुळे मी अक्षरश: अशक्त आणि कमजोर झाले!” ऑलिम्पिक स्पिंटर ॲलिसन फेलिक्सनंही आपली आधीची कंपनी सोडून ‘ॲथलिटा’ या ब्रॅण्डला जवळ केलं. आता ‘सेश’ या नावानं तिनं स्वत:चाच नवा ब्रॅण्ड सुरू केला आहे. फेलिक्सनं तर मोठ्या कंपन्यांच्या धोरणांवर जाहीर हल्ला चढवला होता. स्पर्धा हरल्यावर खेळाडूंना अपमानित वाटेल अशी वागणूक देणं, महिला ॲथलिट‌्सनी मुलांना जन्म देण्यापासून त्यांना रोखणं.. कंपन्यांच्या अशा अरेरावी वागणुकीला फेलिक्सनं जाहीर विरोध केला होता. त्याबद्दल त्यांच्यावर कडक ताशेरेही ओढले होते. चाहत्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी आणि खेळाडूंनीही फेलिक्सचं हे म्हणणं उचलून धरलं होतं. त्यामुळे एका बड्या कंपनीनं आपल्या धोरणांत नुकताच बदलही केला आहे.स्टिपल चेसर (अडथळ्यांच्या शर्यतीतील ॲथलिट) कॉलीन क्विगली हिनंदेखील मोठ्या कंपनीच्या मनमानीला कंटाळून ‘लुलुलेमन’ या छोट्या कंपनीचा हात धरला! ‘लुलुलेमन’ या कंपनीच्या मुख्य ब्रॅण्ड अधिकारी निक्की न्यूबर्गर म्हणतात, “मोठ्या कंपन्या खेळाडूंवर नेहमीच दबाव टाकतात. त्यामुळे खेळाडूंची कामगिरी कशी सुधारणार?”  असा हा प्रेशर-पैशाचा ‘खेळ’, तो कोण थांबवणार? 

‘नुसती प्रसिद्धी काय कामाची?’ अनेक महिला ॲथलिट‌्सचं म्हणणं आहे, आम्ही छोट्या ब्रॅण्ड‌्सना आता पसंती देतोय याचं कारण, त्यांची आणि बड्या कंपन्यांची मानसिकता, वागणूक यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. छोट्या कंपन्या  समानतेची आणि सन्मानाची वागणूक देतात. त्यांच्या नव्या उत्पादनांशी आम्हाला जोडून घेतात आणि एक व्यवसायापेक्षाही एक ‘घरगुती नातं’ तयार करतात. परफॉर्मन्सऐवजी आमच्या ‘पर्सनल स्टोरी’वर आणि आमच्या सोशल मीडिया ॲपिअरन्सकडे ते जास्त लक्ष देतात. ॲथलेटिक्सच्या मैदानात सध्या नाइके आणि आदिदास या मोठ्या ‘खेळाडू’ कंपन्या आहेत. त्यांचं मार्केटिंग जबरदस्त असतं, त्यामुळे खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतात; पण त्यांच्या करिअरसाठी ते नुकसानीचंही ठरू शकतं.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021