शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सेरेनाने शारापोवाला मागे टाकले सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू : शारापोवाला बसला डोपिंगचा फटका

By admin | Published: June 08, 2016 1:50 AM

लॉस एंजेलिस : यंदाच्या मोसमात अनपेक्षितपणे सलग दोन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने कमाईच्या बाबतीत मात्र जबरदस्त आघाडी मिळवली आहे. या वेळी तिने तब्बल ११ वर्षे कमाईच्या बाबतीत अग्रस्थान राखलेल्या रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोवाला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली.

लॉस एंजेलिस : यंदाच्या मोसमात अनपेक्षितपणे सलग दोन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने कमाईच्या बाबतीत मात्र जबरदस्त आघाडी मिळवली आहे. या वेळी तिने तब्बल ११ वर्षे कमाईच्या बाबतीत अग्रस्थान राखलेल्या रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोवाला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली.
एका नामांकित मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार सेरेनाने सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला खेळाडूंमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या वेळी तिने एकेकाळी याबाबतीत अग्रस्थान राखलेल्या आणि सध्या डोपिंगमुळे अनिश्चित काळासाठी बंदीला सामोरी गेलेल्या मारिया शारापोवाला पिछाडीवर टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १२ महिन्यांत सेरेनाने खेळाच्या माध्यमातून आणि त्याव्यतिरिक्त सुमारे २.८९ कोटी डॉलरची कमाई केली आहे.
त्याच वेळी शारापोवा कमाईच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थानी कायम होती. मात्र डोपिंगमध्ये नाव आल्यापासून तिच्या कमाईमध्ये कमालीची घसरण झाली. तरीदेखील ती २.१९ कोटी डॉलरच्या कमाईसह द्वितीय स्थानी आहे. अमेरिकेची मिक्स मार्शल आर्ट खेळाडू रोंडा रोसी हिने जबरदसत मुसंडी मारताना १.४ कोटी डॉलरच्या कमाईसह आठव्या स्थानावरून थेट तिसर्‍या स्थानी कब्जा केला. तर तिच्यानंतर नास्कार ड्रायव्हर डॅनिका पैट्रीक (१.३० कोटी डॉलर) चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे अव्वल १० खेळाडूंमध्ये टेनिसपटूंचा अधिक समावेश आहे.
यामध्ये पोलंडची एग्निज्स्का रदवांस्का (१.०२ कोटी) पाचव्या, डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाका (८० लाख), फ्रेंच ओपन विजेती स्पेनची गरबाइन मुगुरुजा (७६ लाख), सर्बियाची ॲना इवानोविच (७४ लाख), बेलारुसची व्हिक्टोरिया अजारेंका (६६ लाख) आणि कॅनडाची युजिनी बुकार्ड ((६२ लाख) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
..................................