शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

विश्वचषक स्वयंसेवक उपक्रमासाठी तुफान प्रतिसाद

By admin | Published: April 05, 2017 12:11 AM

फीफाच्या मुख्य स्पर्धेचे प्रथमच यजमानपद सांभाळत असलेल्या भारतात १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे

रोहित नाईक,मुंबई- फीफाच्या मुख्य स्पर्धेचे प्रथमच यजमानपद सांभाळत असलेल्या भारतात १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या फुटबॉलप्रेमींमध्येही मोठी उत्सुकता असून आतापर्यंत जगभरातून तब्बल २० हजाराहून अधिक लोकांनी फीफा स्वयंसेवक मोहिमेमध्ये नोंदणी केली आहे. विश्वचषक फुटबॉलसारख्या जागतिक स्पर्धेच्या आयोजनामध्ये काम करण्याची संधी सर्वसामान्य क्रीडाप्रेमींना मिळावी, यासाठी फीफाने आॅलिम्पिकच्या धर्तीवर स्वयंसेवक उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमासाठी जगभरातील ६८ देशांतून सुमारे २० हजार २०० लोकांनी स्वयंसेवक म्हणून अर्ज केले असल्याची माहिती, स्पर्धा आयोजकांनी ‘लोकमत’ला दिली.विशेष म्हणजे, या उपक्रमामध्ये एकट्या भारतातून सर्वाधिक ८ हजार १५६ अर्ज आले आहेत. त्यातही दिल्लीकरांचे अर्ज सर्वाधिक असून त्यानंतर मुंबईकर आणि कोलकाताच्या क्रीडाप्रेमींचा क्रमांक आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत आलेल्या एकूण अर्जांपैकी ६०% अर्ज १८ - २२ या वयोगटातील स्वयंसेवकांचे असून सर्वाधिक वयस्कर स्वयंसेवक म्हणून गोव्याच्या एका ७२ वर्षीय व्यक्तीने अर्ज केला आहे. त्याचबरोबर, या अर्जदारांमध्ये महिलांचाही मोठा सहभाग असून एकूण अर्जदारांपैकी १४००हून अधिक महिला आहेत. या सर्व स्वयंसेवकांवर स्पर्धा आयोजनाच्या प्रमुख जबाबदारी सोपविण्यात येतील. यामध्ये व्यवस्थापन, मार्केटिंग आॅपरेशन, अ‍ॅक्रिडिएशन आणि आयटी यासारख्या जबाबदारी स्वयंसेवकांवर असतील. >स्वयंसेवक उपक्रमाला मिळालेला तुफान प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. आमच्याकडे आतापर्यंत २० हजाराहून अधिक अर्ज आले असून ही संख्या आणखी वाढेल यात शंका नाही. यातून एक गोष्ट नक्की होत आहे की, भारतात होत असलेल्या या स्पर्धेची माहिती जगभरातील फुटबॉलप्रेमींना असून ते आपला वेळ देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या स्वयंसेवकांच्या सहभागामुळे ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल.- जेविअर सेप्पी, स्पर्धा संचालकमहत्त्वाचे मुद्दे..स्वयंसेवक उपक्रम जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ८ हजार १५६ अर्जदारांनी नोंदणी केली.जगभरातील ६८ देशांतील स्वयंसेवकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.नोंदणी झालेल्या अर्जदारांना विविध ३४ भाषांचे ज्ञान असून यामध्ये भारताच्या अधिकृत १९ भाषांचा समावेश आहे.कोचीसाठी ७ हजार ९३५ अर्ज दाखल झाले. जवळपास अर्ध्याहून अधिक स्वयंसेवक अनुभवी आहेत.कोची येथे होणाऱ्या सामन्यांसाठी स्वयंसेवकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.