मुंबई : आगामी आॅस्टे्रलिया दौरा भारताच्या युवा खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा असून या दौऱ्यातून त्यांना भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकसाठी सज्ज होण्याची संधी मिळेल, असे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सांगितले. आॅस्टे्रलियाला रवाना होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये धोनीने संघाच्या तयारीविषयी माहिती दिली.आॅस्टे्रलिया विरुध्द खेळणे कायमच आव्हानात्मक असते. आॅसी विरुध्द खेळणे कायम संघासाठी चांगले ठरते. त्यांच्या विरुध्द प्रत्येक खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो. आॅस्टे्रलियामध्ये लवकर जाऊन तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. शिवाय संघात युवा व नवोदित खेळाडूंचा समावेश असल्याने त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तसेच त्यांची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असेही धोनी म्हणाला.पदीर्घ कालावधीनंतर दुखापतींना मागे टाकून भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे टीम इंडीयामध्ये पुनरागमन झाले आहे. त्याविषयी धोनी म्हणाला की, शमी आमचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने संघासाठी कायम सर्वोत्तम कामगिरी केली असून सामन्यातील प्रत्येक स्लॉटमध्ये यशस्वी मारा करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. दुखापतींना मागे टाकून देशांतर्गत सामन्यात चमकदार कामगिरी करुन तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज आहे. त्याची कामगिरी नक्कीच निर्णायक असेल. अष्टपैलू वेगवान गोलंदाजंची गरज...आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व यशस्वी संघावर नजर टाकल्यास लक्षात येईल ते संघातील अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी. हे सर्व अष्टपैलू वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळेच भारताला देखील वेगवान गोलंदाज अष्टपैलू गोलंदाजांची फळी तयार करावी लागेल. त्यादृष्टीनेच या दौऱ्यात युवा खेळाडूंकडे विशेष लक्ष असेल.
आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा विश्वचषकासाठी महत्त्वाचा
By admin | Published: January 06, 2016 12:01 AM