मुंबई : उत्तम निकालासाठी प्रशिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षणासोबत गौरवित करणे आणि त्यांना स्वतंत्र ओळख मिळणे गरजेचे आहे, असे मत भारतीय बॅडमिंटन राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. गोपीचंद रिओ आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवून देणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे प्रशिक्षक आहेत.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लंडन आॅलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक पटकाविले होते. गोपीचंद यांच्या मताचे सिंधू हिने समर्थन केले. ती म्हणाली, ‘‘मी माझ्या प्रशिक्षकांची मनापासून आभारी आहे. मी जे कोणी आहे ती त्यांच्या प्रचंड कष्टामुळे आहे. त्यांची मेहनत आणि त्याग यांच्या जोरावरच मी या स्तरावर पोहोचू शकली. मी माझ्या आई-वडिलांचीही खूप आभारी आहे. (वृत्तसंस्था)
प्रशिक्षकांना ओळख मिळणे गरजेचे : गोपीचंद
By admin | Published: September 08, 2016 4:21 AM