शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

छत्तीस कोटी लोक बघतात आयपीएल

By admin | Published: March 10, 2017 6:16 AM

दहाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेड लावलेले असून, हे टी-20 सामने छत्तीस कोटी लोक बघत असल्याची आकडेवारी

मुंबई : दहाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेड लावलेले असून, हे टी-टष्ट्वेंटी सामने छत्तीस कोटी लोक बघत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. नवव्या सत्रात एकूण ३६.१ कोटी चाहत्यांनी आयपीएलचे सामने पाहिल्याचे सोनी नेटवर्कने जाहीर केले. दरवर्षी सोनी नेटवर्ककडून करण्यात येणाऱ्या हटके आयपीएल प्रमोशनमुळे या स्पर्धेने लोकप्रियतेचा कळस गाठला असून यंदाची स्पर्धा खास क्रिकेटप्रेमींसाठी अर्पण करण्यात आली आहे. नवव्या सत्रात तब्बल १५.९ कोटी ग्रामीण भागातील लोकांनी आयपीएल पाहिले.महत्त्वाचे म्हणजे एकूण क्रिकेट चाहत्यांमध्ये महिलांची संख्या ४१ टक्के असल्याची माहितीही कंपनीकडून मिळाली आहे. २०१३ साली स्पॉट फिक्सिंगमुळे डाग लागल्यानंतरही आयपीएलच्या लोकप्रियतेमध्ये कमतरता झाली नाही. याचे श्रेय चाहत्यांना देताना सोनीचे वरिष्ठ बिझनेस प्रमुख नीरज व्यास यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘चाहत्यांमुळेच आयपीएल तुफान यशस्वी झाले असून त्यांंनी खेळावरील प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही.’दरवर्षी हटके प्रमोशन‘दस साल आपके नाम’ असे यंदाच्या आयपीएलचे प्रमोशन करण्यात आले असून २००८ सालापासून क्रिकेटप्रेमींनी ज्याप्रकारे या स्पर्धेला ‘लाईक’ केले आहे, ते सर्वकाही अनेकप्रकारच्या आकर्षक व्हिडिओ प्रमोद्वारे मांडण्याचा उत्कृष्ट प्रयत्न सोनी नेटवर्कने केला आहे. यामध्ये ‘अंतरयामी फॅन’, ‘अंडर प्रेशर फॅन’, ‘वेरी वेरी वेहेमी फॅन’, ‘फरिश्ते फॅन’ आणि ‘आॅल राऊंडर फॅन’ अशा प्रकारचे आकर्षक व्हिडिओ प्रमो तयार करण्यात आले आहेत.