नागपूर : कॅनडामधील सरे शहरात होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक सॉफ्टबॉलस्पर्धेसाठी विदर्भातील दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे.नागपूरची पूजा भारती आणि अमरावती येथील जुही मकेश्वर यांचा भारतीय संघातसमावेश करण्यात आला. विश्वचषकाचे आयोजन १५ तारखेपासून सुरू होत आहे.यासाठी मंगळवारपासून दिल्लीत सराव शिबिर सुरू झाले. ते ११ जुलैपर्यंतचालेल. पूजा आणि जुही या दोघीही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सिनियरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू ठरल्या ह ोत्या. आशिया गटातून भारतीयमहिलांनी पहिल्यांदा विश्वचषकाची पात्रता मिळविली हे विशेष. (क्रीडाप्रतिनिधी)
विदर्भाच्या दोन खेळाडू भारतीय संघात
By admin | Published: July 05, 2016 8:58 PM