शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी

By admin | Published: June 08, 2016 10:04 PM

आॅस्टे्रलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर टेनिस सुंदरी मारिया शारापोवाला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. ८ : आॅस्टे्रलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर टेनिस सुंदरी मारिया शारापोवाला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पाच वेळा ग्रँडस्लॅम पटकावलेल्या रशियाच्या या स्टार खेळाडूला याआधी मार्च महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) अनिश्चित काळापर्यंत निलंबित केले होते. शारपोव्हाने स्वत:हून काही महिन्यांपुर्वी लॉस एंजेलिसमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन जानेवारीमध्ये डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरल्याची माहिती दिली होती. त्यावेळी शारापोव्हाने, जागतिक डोपिंगविरोधी संस्थेने एक जानेवारीपासून खेळाडूंना मेलडोनियमचा वापर करण्यापासून विरोध केल्याचे माहित नसल्याचे सांगितले होते. त्याचवेळी या तारखेनंतर शारापोव्हाने मेलडोनियमचे सेवने केले असल्याचे तीचे वकील जॉन हैगरटी यांनी सांगितले होते. दरम्यान, बुधवारी देण्यात आलेल्या निकालामध्ये सांगण्यात आले की, शारापोव्हाचा उद्देश फसवणूक करण्याचा नव्हता. मात्र पॉझिटीव्ह रिपोर्टसाठी ती एकटी जबाबदार आहे. शिवाय यामध्ये तीची खूप मोठी चूकही आहे. त्याचप्रमाणे आयटीएफने सांगितेल की, ‘‘आॅस्टे्रलिया ओपन दरम्यान पॉझिटीव्ह निकाल आल्यानंतर दोन फेब्रुवारीला मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेतही झालेल्या चाचणीत मारिया शारापोव्हाने मेलडोनियमचे सेवन केल्याचे निष्पण झाले होते.’’ दरम्यान, दोन वर्षांच्या लागलेल्या बंदीविरुध्द शारापोव्हा अपील करु शकते, परंतु तिच्याकडून अद्याप कोणताच निर्णय आलेला नाही. (वृत्तसंस्था)