शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
2
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
3
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
4
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह गोल्ड रेट
5
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
6
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
7
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
8
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
9
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
10
IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध
11
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
12
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
13
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
14
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
15
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
16
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
17
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
18
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
19
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
20
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले

यू मुंबाची ‘बुल्स’ला जोरदार धडक

By admin | Published: February 26, 2016 3:57 AM

तुफान फॉर्ममध्ये असलेल्या गतविजेत्या यू मुंबाने विजयी घोडदौड कायम ठेवताना बंगळुरू बुल्सचा ३९-१८ असा धुव्वा उडवला. सलग सहावा विजय मिळवताना यू मुंबाने गुणतक्त्यात

- रोहित नाईक,  नवी दिल्लीतुफान फॉर्ममध्ये असलेल्या गतविजेत्या यू मुंबाने विजयी घोडदौड कायम ठेवताना बंगळुरू बुल्सचा ३९-१८ असा धुव्वा उडवला. सलग सहावा विजय मिळवताना यू मुंबाने गुणतक्त्यात ४० गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेऊन उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली.त्यागराज क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या एकतर्फी सामन्यात मुंबईकरांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. मुंबईकर बंगळुरूच्या खेळाडूंना सहज मारून गुणसंख्या सहज वाढवत असताना, दुसरीकडे बंगळुरूचे खेळाडू मोठ्या परिश्रमाने मुंबईच्या खेळाडूंना बाद करत होते. मात्र मुंबईकरांचा धडाका इतका जबरदस्त होता, की बाद झालेला खेळाडू पुढच्याच चढाईमध्ये परतत होता. यामुळे मुंबईची अघाडी झपाट्याने वाढली, तर बंगळुरू प्रचंड दबावाखाली आले. बंगळुरूवर लोण चढवून मुंबईकरांनी मध्यंतराला १६-५ अशी आघाडी घेऊन चित्र स्पष्ट केले. यानंतर यू मुंबाने आणखी २ लोण चढवून बंगळुरूला प्रतिकाराची एकही संधी दिली नाही. विशेष म्हणजे विजय स्पष्ट दिसत असताना मुंबईकरांनी आपल्या राखीव खेळाडूंनाही संधी दिली. पुन्हा एकदा कर्णधार अनुप कुमार व रिशांक देवाडिगा यांचे आक्रमण आणि मोहित चिल्लरच्या दमदार पकडी मुंबईच्या विजयात निर्णायक ठरले. बंगळुरूकडून पवन कुमार एकाकी लढला.अन्य सामन्यांत बलाढ्य पटना पायरेट्सने विक्रमी विजय मिळवताना यजमान दबंग दिल्लीला ६७-३४ असे लोळवून स्पर्धा इतिहासात सर्वाधिक गुणांची नोंद केली. याआधी २०१४मध्ये तेलगू टायटन्सने पुणेरी पलटणला ६०-२४ असे नमवले होते. पटनाने मध्यंतराला ३८-१७ असे वर्चस्व राखले. सामन्यात तब्बल ५ लोण चढवताना पटनाने एकहाती दबदबा राखला. कर्णधार रोहित कुमार व संदीप नरवालने संघाच्या विजयात निर्णयाक कामगिरी केली. दिल्लीकडून कर्णधार काशिलिंग आडके व सुरजित सिंग यांची झुंज अपयशी ठरली.यू मुंबा सध्या सुपरडुपर फास्ट झाली असून, हाच वेग आम्हाला कायम ठेवायचा आहे. गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी पटना पायरेट्सची हार आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मुंबईत होणाऱ्या प्रत्येक सामन्यात आम्हाला विजय मिळवावा लागेल.- अनुप कुमार, कर्णधार : यू मुंबा