आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या युरो कपचा थरार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. युरो कप स्पर्धेत नवनवे रेकॉर्ड होण्यास सुरुवात झाली आहे. मातब्बर संघ आपल्या दमदार कामगिरीनं स्पर्धेत पकड निर्माण करताना दिसत आहेत. यातच एक जबरदस्त सामना ग्लास्गोमध्ये अनुभवयाला मिळाला. स्कॉटलँड आणि झेक प्रजासत्ताक (Scotland vs Czech Republic) यांच्यात झालेल्या सामन्यात एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. झेक प्रजासत्ताच्या पॅट्र्रीक शिकनं (Patrik Schick) केलेल्या गोलची जोरदार चर्चा रंगली आहे.
पॅट्रीकनं या सामन्यात दोन गोल करुन संघाला विजय प्राप्त करुन दिला. पण त्यानं मैदानाच्या मध्यावरुन थेट गोलपोस्टमध्ये डागलेल्या गोलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पॅट्रीकच्या केलेला गोल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि सोशल मीडियात पॅट्रीकच्या गोलची जोरदार चर्चा सुरू झालीय. पॅट्रीकनं केलेला गोल युरो कपच्या इतिहासातील न भुतो न भविष्यती असा असल्याचं काही नेटिझन्स म्हणत आहेत. तर काहींनी फुटबॉल विश्वातील आजवरचा सर्वोत्तम गोलपैकी एक गोल असल्याचं म्हटलं आहे.
युरो कपमध्ये सोमवारी ड गटातील दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडसमोर झेक रिपब्लिकचं आव्हान होतं. सामन्याच्या पहिल्या हाफच्या ४२ व्या मिनिटाला पॅट्रीक शिकनं पहिला गोल करुन संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्याच्या सातव्याच मिनिटात पॅट्रीकनं अफलातून गोलं नोंदवून २-० अशी आघाडी घेतली. पण हा गोल केवळ २-० अशी आघाडीच देणार नव्हता, तर या गोलनं फुटबॉल चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
४५ मीटर दूरवरुन कले अफलातून गोलसामन्याच्या ५२ व्या मिनिटाला मैदानाच्या हाफ पोस्टवर फुटबॉल पॅट्रीककडे आला. गोलकिपर गोल पोस्टपासून खूप दूरवर उभा असल्यानं पॅट्रीकनं पाहिलं आणि याच संधीचा फायदा घेत सेंट्रल लाइनवरुनच पॅट्रीकनं अफलातून गोल केला. पॅट्रीकच्या आश्चर्यकारक गोलनं स्कॉटलंडचे सर्वच खेळाडू अवाक् झाले. पॅट्रीकच्या या जबरदस्त गोलचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
पॅट्रीकनं नोंदवला विक्रमझेक प्रजासत्ताकच्या पॅट्रीक शिकनं केवळ गोल करुन संघाला विजय प्राप्त करुन दिला नाही. तर त्यानं मैदानाच्या सेंट्रल लाइनजवळून केलेल्या गोलची युरो कप स्पर्धेच्या इतिहासात नोंद झाली आहे. पॅट्रीक मैदानाच्या ४९.७ यार्ड म्हणजेच ४५ मीटर इतक्या दूरवरुन गोल केला. या गोलसह युरो कपच्या इतिहासात १९८० नंतर सर्वात दूरच्या अंतरावरुन गोल करणारा तो खेळाडू ठरला आहे. पॅट्रीकनं जर्मनीच्या टॉर्स्टन फ्रिन्सचा विक्रम मोडीस काढला आहे. फ्रिन्सनं २००४ साली युरो कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध ३५ मीटर अंतरावरुन गोल केला होता.