ग्लास्गो : अतिरिक्त वेळेत आर्तेम डोवबिक याने केलेला गोल युक्रेनसाठी निर्णायक ठरला आणि त्यांनी या गोलच्या जोरावर स्वीडनचा २-१ असा पराभव करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अतिरिक्त वेळेच्या इंज्युरी टाइममध्ये गोल करीत आर्तेमने संघाच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली.
ओलेक्झांद्र जिनचेंको याने २७ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर युक्रेनने १-० अशी आघाडी घेतली. मात्र, मध्यंतराच्या काही मिनिटे आधी त्यांनी ही आघाडी गमावली. ४३ व्या मिनिटाला एमिल फोर्सबर्गने शानदार गोल करीत स्वीडनला बरोबरीत आणले. मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ केला. मात्र, गोल करण्यात कोणालाही यश आले नाही. निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेच्या इंज्युरी टाइममध्ये आर्तेमने केलेला गोल युक्रेनसाठी मोलाचा ठरला. आर्तेमने केलेला हेडरवर चेंडू स्वीडनचा गोलरक्षक रॉबिन ओल्सनला चकवून गोलजाळ्यात गेला.
उपांत्यपूर्व सामनेस्वित्झर्लंड वि. स्पेन २ जुलै रात्री ९.३०बेल्जियम वि. इटली २ जुलै मध्यरात्री १२.३०झेक प्रजासत्ताक वि. डेन्मार्क ३ जुलै रात्री ९.३०यूक्रेन वि. इंग्लंड ३ जुलै मध्यरात्री १२.३०