गुवाहाटी : भारतीय खेळाडूंनी कुस्ती, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, वुशू, सायकलिंग क्रीडा प्रकारांमध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलूट केली. कुस्ती प्रकारात भारतीय मल्लांनी एकूण १४ सुवर्ण व दोन रौप्यपदके जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये चार, जलतरणमध्ये तीन, तिरंदाजीमध्ये दोन, स्क्वॅशमध्ये एक, सायकलिंगमध्ये दोन आणि वुशूमध्ये एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले. भारतीय संघाने सोमवारपर्यंत ५३ सुवर्ण, २0 रौप्य व ६ कांस्यपदके जिंकली आहेत. वुशू भारताला १ सुवर्ण, १ रौप्यएम. पुनिशिवा मेईतेईने सोमवारी १२व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशू क्रीडाप्रकारात पुरुष नानक्वान गटात आणि स्वाच्छा जाटवने महिला नानक्वान गटात भारताला अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई करून दिली. भारताने स्पर्धेत या क्रीडाप्रकारात आतापर्यंत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य पदक पटकावले आहे. भारताने वुशूमध्ये आणखी ३ पदके निश्चित केली आहे. सानतोईदेवी (५२ किलो), अनुपमादेवी (६० किलो) आणि पूजा कादियान (७० किलो) यांनी आपापल्या गटांत अंतिम फेरी गाठली. सायकलिंग : पुरुष व महिला संघांना सुवर्णभारताच्या पुरुष व महिला सायकलपटूंच्या संघांनी चमकदार कामगिरी करताना दोन्ही विभागांत सुवर्णपदक पटकावले. पुरुष संघात समावेश असलेल्या अरविंद कुमार, मनजितसिंग, दीपक कुमार राही आणि मनोहर लाल बिष्नोई यांनी चमकदार कामगिरी करताना ७० किलोमीटर सांघिक ट्रायल स्पर्धेत १ तास २९ मिनिटे ३७.८४० सेंकद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. याव्यतिरिक्त अरविंद व मनजित यांनी या वैयक्तिक गटात शानदार कामगिरी करताना अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत पाकिस्तानने रौप्य, तर श्रीलंका संघाने कांस्य पदक पटकावले. महिला विभागात विद्यालक्ष्मी तोरांगबाम, ऋतुजा सातपुते, मनीषा जी. आणि चाओबादेवी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ४० किलोमीटर सांघिक ट्रायलमध्ये ५९ मिनिटे २३.५२ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. विद्यालक्ष्मी व चाओबा यांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदकाचा मान मिळविला. महिला विभागात सांघिक स्पर्धेत श्रीलंका संघाने रौप्य, तर पाकिस्तान संघाने कांस्य पदक पटकावले. स्क्वॉश चिन्नप्पाला सुवर्णभारताची स्टार खेळाडू ज्योत्स्ना चिनप्पाने सोमवारी महिलांच्या वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत पाकिस्तानच्या मारिया तुरपाकी वजीरचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. अव्वल मानांकित व जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या चिनप्पाने एक सेटने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना आर. जी. बरुआ स्पोर्ट्स परिसरात दुसऱ्या मानांकित वजीरचा १०-१२, ११-७, ११-९, ११-७ने पराभव केला. भारताने या स्पर्धेत स्क्वॉशमध्ये आतापर्यंत ३ पदके पटकावली आहेत. त्यात सौरव घोषाल आणि हरिंदर पालसिंग संधू यांनी रविवारी पाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून कांस्यपदक पटकावले होते.बॅडमिंटन :सांघिक स्पर्धेत भारताला दोन सुवर्णभारतीय बॅडमिंटनपटूंनी सोमवारी दोन सुवर्णपदकांची कमाई करीत पदकांचे खाते उघडले. पुरुष व महिला संघांनी अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध सहज विजय नोंदवला. भारताने उभय विभागात ३-० ने विजय मिळवला. पुरुष विभागात श्रीकांतने बुवेनाका गुनातिलकचा २१-१४, २१-१४ ने पराभव करीत भारताला शानदार सुरुवात करून दिली. एचएस प्रणयने एकेरीच्या दुसऱ्या लढतीत सचिन डियासविरुद्ध २१-१३, २१-१६ ने सरशी साधली, तर मनू अत्री व सुमित रेड्डी यांनी दुहेरीमध्ये गुनातिलक व डियास या जोडीचा २१-१२, २१-११ ने सहज पराभव करीत भारताचे सुवर्णपदक निश्चित केले. महिला विभागात स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूने कोविंदी ईशादिकाचा २१-७, २१-५ ने सहज पराभव केला. रुतविका शिवानीने संघर्षपूर्ण लढतीत तिलिनी प्रमोदिकाचा २३-२१, २१-१३ ने पराभव करीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पा व सिंधू या जोडीने अचिनी रत्नासिरी व उपुली समाथिका या श्रीलंकेच्या जोडीचा २१-१३, २१-१३ ने पराभव करीत सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित करून दिला. तिरंदाजी : भारताला दोन सुवर्णभारतीय महिला व पुरुष तिरंदाजांनी चमकदार कामगिरी करताना सोमवारी कम्पाउंड गटात दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पूर्वशा सुधीर शिंदे, ज्योती सुरेखा वेनम आणि लिली चानू यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने बांगलादेशाचा २२८-२१७ने पराभव करून सुवर्णपदक पटकावले. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता अभिषेक वर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जवाहरलाल नेहरू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत अर्जुन पुरस्कारविजेत्या दिल्लीच्या अभिषेकने रजत चौहान व मानस ज्योती चंगमाई यांच्या साथीने भारतीय संघाला भूतानविरुद्ध २३०-२१९ असा एकतर्फी विजय मिळवून दिला. भारोत्तोलन : कबिता, विकास यांना सुवर्णभारताने १२व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारोत्तोलनमध्ये (वेटलिफ्टिंग) चमकदार कामगिरी कायम राखताना सोमवारी २ सुवर्णपदकांची कमाई केली. शक्तीचा खेळ असलेल्या या क्रीडाप्रकारात यजमान देशाने आतापर्यंत एकूण ८ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. भारताने सॅग स्पर्धेत भारोत्तोलनामध्ये गेल्या २ दिवसांत ६ सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत तिसऱ्या दिवसाची सुरुवातही सुवर्णपदकाने झाली. कबितादेवीने महिलांच्या ७५ किलोगटात आणि विकास ठाकूरने पुरुषांच्या ८५ किलोगटात भारताला सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला. कविताने ७५ किलोगटात स्नॅचमध्ये ९२ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये ११८ किलो वजन पेलताना एकूण २१० किलो वजन उचलले. श्रीलंकेला रौप्य, तर बांगलादेशाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यजमान भारताच्या विकास ठाकूरने ८५ किलोगटात स्नॅचमध्ये १४०, तर क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन पेलले. या गटात पाकिस्तानला रौप्य, तर श्रीलंकेला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारोत्तोलन : कबिता, विकास यांना सुवर्णभारताने १२व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारोत्तोलनमध्ये (वेटलिफ्टिंग) चमकदार कामगिरी कायम राखताना सोमवारी २ सुवर्णपदकांची कमाई केली. शक्तीचा खेळ असलेल्या या क्रीडाप्रकारात यजमान देशाने आतापर्यंत एकूण ८ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. भारताने सॅग स्पर्धेत भारोत्तोलनामध्ये गेल्या २ दिवसांत ६ सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत तिसऱ्या दिवसाची सुरुवातही सुवर्णपदकाने झाली. कबितादेवीने महिलांच्या ७५ किलोगटात आणि विकास ठाकूरने पुरुषांच्या ८५ किलोगटात भारताला सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला. कविताने ७५ किलोगटात स्नॅचमध्ये ९२ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये ११८ किलो वजन पेलताना एकूण २१० किलो वजन उचलले. श्रीलंकेला रौप्य, तर बांगलादेशाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यजमान भारताच्या विकास ठाकूरने ८५ किलोगटात स्नॅचमध्ये १४०, तर क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन पेलले. या गटात पाकिस्तानला रौप्य, तर श्रीलंकेला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय मल्लांना १६ पैकी १४ सुवर्णभारतीय मल्लांनी १२व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये डावावर असलेली १६ पैकी १४ सुवर्णपदके पटकावण्याची कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत दुय्यम दर्जाच्या खेळाडूंना संधी दिली होती; पण घरच्या वातावरणात भारतीय मल्ल दक्षिण आशियातील आपल्या शेजारी राष्ट्रांच्या मल्लांच्या तुलनेत सरस ठरले. भारतीय मल्लांनी सोमवारी सहापैकी पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले. आर. जी. बरुआ क्रीडा परिसरात सोमवारी कुस्ती स्पर्धेचा समारोप झाला. भारतीय मल्लांनी या स्पर्धेत एकूण १४ सुवर्ण आणि २ रौप्य पदके पटकावली. भारताने महिला विभागातील सर्व ८ सुवर्णपदके पटकावली, तर पुरुष विभागात भारताला ६ सुवर्ण व २ रौप्य पदके पटकावता आली. पाकिस्तानने २ सुवर्णपदके पटकावली. शिल्पी शियोरानने सोमवारी भारताला सुवर्णपदकाची सुरुवात करून दिली. तिने महिलांच्या ६३ किलोगटात अंतिम फेरीत बांगलादेशाच्या फरजाना शरमीनचा पराभव केला. रजनीने ६९ किलोगटात बांगलादेशाच्या शिरीन सुलतानाचा, तर निक्कीने ७५ किलोगटात श्रीलंकेच्या डब्ल्यू वीरासिंहचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुष विभागात मौसम खत्री आणि प्रदीप यांनी अनुक्रमे ९७ व ७४ किलोगटात सुवर्णपदकाचा मान मिळवला, तर मनदीपला (१२५ किलो) अंतिम फेरीत पाकिस्तानच्या जमान अन्वरविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१०मध्ये या स्पर्धेत भारताने पुरुष विभागात ३ सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले होते.तर पाकिस्तानने २ सुवर्ण व एक रौप्य पदकाचा मान मिळविला होता.
भारतीय संघाचे निर्विवाद वर्चस्व
By admin | Published: February 09, 2016 3:29 AM