कराची : इंग्लंड दौऱ्यात हेडिंग्ले सामन्यात केवळ पाच षटके गोलंदाजी करताच मैदान सोडणाऱ्या मोहम्मद इरफानवर रोष व्यक्त करणारे पाकिस्तान संघाचे कोच मिकी आर्थर यांनी ‘अनफिट’ आणि ‘कुचकामी’ खेळाडूंना मी खपवून घेणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली आहे.इरफानला जखमी मोहम्मद हफिजऐवजी संघात स्थान देण्यात आले होते. त्याने इंग्लंडमध्ये हेडिंग्लेच्या चौथ्या वन डेत पाच षटकांत दोन गडी बाद केले पण थकवा जाणवत असल्याचे कारण देत मैदान सोडले. नंतर तो उर्वरित सामन्यातही खेळला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौथ्या वन डेदरम्यान इरफानने स्रायू दुखावल्याचे कारण देत लंगडताना मैदान सोडले तेव्हा आर्थर यांनी पाकला परत जा, असे सांगून टाकले. त्यावर इरफान नाराज झाला. लाहोरला परतल्यानंतर इरफानने काही अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करीत सांगितले की मी अनफिट नव्हतो. माझ्या पायाचे स्रायू ताणले गेले होते. चौथ्या सामन्यानंतर मी लगेच फिट झालो. मी ही माहिती आर्थर यांना दिल्यानंतरही त्यांनी मला लाहोरला परत जा आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिपोर्ट करीत वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेपूर्वी फिट होण्याचे फर्मान सोडले. याशिवाय मोहम्मद हफिज याला देखील आर्थर यांनी संघासोबत राहण्याची परवानगी दिली नाही. हफिज फिटनेसमुळे दुसऱ्या वन डेपर्यंत खेळू शकला नव्हता. हफिज प्रकरणी आर्थर यांनी स्पष्ट केले की अनफिट खेळाडूंना संघासोबत राहण्याची मी परवानगी देणार नाही.>पाकला मिळणार ‘मानाची गदा’२००३ ला सुरू झालेल्या कसोटी रँकिंगमध्ये प्रथमच अव्वल स्थान पटकविणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाला २१ सप्टेंबर रोजी मानाची गदा सोपविली जाईल.लाहोरच्या कर्नल गडाफी स्टेडियममध्ये आयोजित सोहळ्यात आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन हे पाकचा कर्णधार मिस्बाह उल हक याच्याकडे गदा सोपवतील. इंग्लंडविरुद्ध मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवित पाकने अव्वल स्थान संपादन केले. भारत- विंडीज यांच्यातील पोर्ट आॅफ स्पेन कसोटी पावसात वाहून गेल्याचा लाभ पाक संघाला मिळाला. भारताने विंडीजविरुद्ध चार सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. पण अव्वल स्थान टिकविण्यासाठी चौथ्या सामन्यात विंडीजला पराभूत करणे क्रमप्राप्त झाले होते. ४भविष्यात रँकिंगमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पाक संघ भारताच्या तुलनेत एका गुणाने पुढे आहे. पाकचे १११, भारताचे ११०, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे समान १०८, द. आफ्रिका ९६, श्रीलंका ९५, न्यूझीलंड ९५, वेस्ट इंडिज ६७, बांगला देश ५७ आणि झिम्बाब्वेचे केवळ आठ गुण आहेत.>माझ्याकडे जादूची कांडी नाही : अमीर‘‘पहिल्या दिवसापासून अपेक्षेनुसार कामगिरी घडेल, अशी जादूची कांडी माझ्याकडे नाही.’’सहा वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर याचे हे उद्गार आहेत. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाच वर्षे बंदीचा सामना केल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मालिकेद्वारे आमीरचे पाक संघात पुनरागमन झाले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही आमीर खेळला. तो म्हणतो,‘ संघात खेळलो की माझ्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी एका दिवसात होत नाही. माझ्याकडे अशी कुठलीही जादूची छडी देखील नाही. कठोर मेहनतीच्या बळावर हळूहळू पूर्वीची लय गाठणे शक्य असल्याची मला जाणीव आहे. मी करिअरला सुरुवात केल्यानंतर वर्षभर उलटल्यानंतरच चाहत्यांनी माझ्या कामगिरीची दखल घेतली होती.’>उमर अकमलचा संघात समावेशकराची : वेस्ट इंडिजविरुद्ध दुबई आणि अबूधाबी येथे २३ सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानने उमर अकमल याला संघात स्थान दिले. बेशिस्तीच्या कारणास्तव इंग्लंड दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले होते. पाक संघ : सर्फराज अहमद (कर्णधार), शार्जिल खान, खालिद लतीफ, बाबर आझम, उमर अकमल, शोएब मलिक,मोहम्मद रिझवान, इमाद वसीम, हसन अली, वहाब रियाझ, मोहम्मद आमीर, सोहेल तन्वीर, मोहम्मद नवाज, साद नसीम आणि रुमान रईस.
अनफिट, कुचकामी खेळाडू पाक संघात नकोच!
By admin | Published: September 10, 2016 3:44 AM