केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा विज्ञान परिषदेला संबोधित करताना, देशातील “नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स” येथे क्रीडा विज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला. या परिषदेमध्ये भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, २००३ विश्व अजिंक्यपद कांस्यपदक विजेती अंजू बॉबी जॉर्ज आणि भारतीय क्रिकेटर दीपक चहर यांच्यासह अनेक आजी-माजी क्रीडापटू या परिषदेला उपस्थित होते.
या एक दिवशीय क्रीडा विज्ञान परिषदेचे आयोजन “ट्रान्सस्टेडिया विद्य्पीठ (ट्रान्सस्टेडिया एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनची शैक्षणिक शाखा), भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्र (एनसीएसएसआर), युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सहकार्याने केले होते. यामध्ये एक व्यावसायिक भागीदार म्हणून “स्पोर्ट्सकॉम इंडस्ट्री कॉन्फेडरेशन” सहभागी झाले होते. या विज्ञान परिषदेचा भारतीय खेळ व खेळाडूंमध्ये उच्च दर्जाची कामगिरी करणे व खेळाचा दर्जा उंचावण्याचा महत्वाचा उद्देश होता.
भारताला २०३६ चे ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेऊन आपली उद्दिष्टे व लक्ष यावर लक्ष केंद्रित करून भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवण्याचे ध्येय बाळगल्याचे अनुराग ठाकूर आणि या परिषदेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी क्रीडा विज्ञानाचे ज्ञान व त्याचा उपयोग आपल्या क्रीडा क्षेत्राला उभारी देण्याचे काम करू शकेल व हे आपल्या खेळाडूंची कामगिरी उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावेल असे स्पष्ट केले.
या परिषदे दरम्यान “ट्रान्स्टेडिया आणि भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या पहिल्या भारतीय क्रीडा विज्ञान परिषदे २०२४ मध्ये सहभागी होताना आनंद होत असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. अशा प्रकारची परिषद ट्रान्सटेडिया सारख्या संस्थेने पुढाकार घेऊन असे आयोजन करताना पाहून खूप आनंद होत असल्याचेही ते म्हणाले.
क्रीडा विज्ञान हे खेळाडूंच्या विकासात व तंत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगताना ज्ञान आणि समज यांचे अनोखे भांडार असल्याचे सांगितले. क्रीडा विज्ञान आपल्या मुलांना त्यांच्या शारीरिक मर्यादा समजून घेण्यास मदत करते. हे त्यांना त्यांची शक्ती आणि क्षमता समजून घेण्यास आणि त्यांच्या क्षेत्रातील उच्च कामगिरी व साहसाने पुढे जाण्यास मदत करेल.
क्रीडा मंत्री पुढे म्हणाले, "खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षणात मदत करण्यासाठी क्रीडा शास्त्राच्या घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे त्यांना त्यांची ताकद समजण्यास, सुधारण्यासाठी आणि त्यांच्या ध्येयापर्यंत त्यांची क्षमता वाढवण्यास मदत केली जाते. क्रीडा विज्ञान खरोखरच खेळाडूंच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. ते त्यांच्यासाठी शक्ती आणि समर्थनाचा स्त्रोत आहे. क्रीडा विज्ञानाच्या सामावेशामुळे त्यांना कितीही आव्हाने आली तरी खेळाडू आपली मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतो. त्यामुळेच आम्ही आमच्या नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्समध्ये स्पोर्ट्स सायन्स विभाग तयार करण्याचे सुनिश्चित करत आहोत.
दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रा यानेही खेळाडूंच्या जीवनात क्रीडा शास्त्राच्या आवश्यकतेवर भर दिला आणि प्रशिक्षकांना त्यांच्या कार्यक्रमात त्याचा समावेश करण्याचे आवाहन केले आहे. हि परिषद क्रीडा विज्ञानाच्या क्षेत्रातील आपल्या देशाच्या दूरदर्शी दृष्टिकोनाच्या अग्रगण्य भावनेचा पुरावा आहे. याच्या समावेशामुळे खेळाडूंमध्ये त्यांची क्षमता व प्राविण्य वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. सर्जनशील शोधाची हीच भावना मला क्रीडा विज्ञान परिषदेमध्ये उपस्थित क्रीडा शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि सहभागी खेळाडू यांच्या कार्यातून दिसून येते.
बिंद्रा म्हणाले, "ॲथलीटच्या प्रगतीचे संरक्षक म्हणून प्रशिक्षकांनी या डिजिटल युगात त्यांच्या प्रशिक्षण पद्धती सुधारण्यासाठी क्रीडा शास्त्राचा अंगीकार केला पाहिजे. एक राष्ट्र म्हणून ऑलिम्पिकमध्ये पुढे जाण्यासाठी, आम्हाला क्रीडा शास्त्राचा समावेश करणे आवश्यक आहे. खेळाडूंनी अत्याधुनिक सुविधा वापरत पायाभूत सुविधांच्या प्रत्येक स्तरावर क्रीडा शास्त्राचा समावेश आपल्या जीवनात केला पाहिजे जेणेकरून भारताला जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून विकसित होण्यास मदत होईल.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) चे मुख्य पोषणतज्ञ जी वाणी भूषणम; डॉ. प्रलय मजुमदार (वरिष्ठ सल्लागार, क्रीडा विज्ञान शिक्षण आणि संशोधन (क्रीडा विज्ञान आणि विश्लेषण केंद्र, IIT मद्रास); डॉ. नानकी जे चढ्ढा (क्रीडा आणि कामगिरी मानसशास्त्रज्ञ आणि माजी भारतीय गोल्फर); डॉ. पियरे ब्यूचॅम्प (उच्च-कार्यक्षमता संचालक) , नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया); अमेय कोळेकर (स्पोर्ट्स सायन्स हेड, पदुकोण द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स) हे दिग्गज क्रीडा विज्ञान परिषदेत सहभागी होते.
या परिषदेमध्ये टाप्सचे सीईओ पी के गर्ग यांचे एक विशेष सत्र आणि राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सी (NADA) चे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी श्री वीरेंद्र राजपूत यांचे अखंडता आणि निष्पक्ष खेळ या विषयावर सादरीकरण झाले.