शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

Neeraj Chauhan: भारताला मिळाला अजून एक 'नीरज'; रस्त्यावर भाजी विकणारा तरुण करणार भारताचे प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 4:00 PM

Asian Games Neeraj Chauhan: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील युवा तिरंदाज नीरज चौहान आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे.

लखनौ: गेल्यावर्षी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी केली होती. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी सुपर्णपदक जिंकले. त्यानंतर आता अजून एक नीरज भारताचे नाव उंचावण्यासाठी तयार आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील युवा तिरंदाज नीरज चौहान(Neeraj Chauhan) आशियाई क्रीडा स्पर्धेत (2022 Asian Games) भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. आशियाई स्पर्धेसोबतच नीरजची तिरंदाजी विश्वचषक आणि जागतिक खेळांमध्येही निवड झाली आहे.

गरिबीवर केली मात...दोन वर्षांत कोरोना काळात अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली. अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु यावर मात करुन उत्तर प्रदेशच्या नीरज चौहानने आपले कुटुंब तर साभाळलेच, सोबत आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरुच ठेवली. हरियाणाच्या सोनीपत येथे 24 ते 30 मार्च दरम्यान सुरू असलेल्या तिरंदाजीच्या चाचणीत नीरज पात्र ठरला आहे. चाचण्यांमध्ये दुसरे स्थान पटकावून नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

कोरोना काळात रस्त्यावर भाजी विकलीनीरज चौहानचे वडील अक्षयलाल हे मेरठमधील कैलाश प्रकाश स्टेडियममध्ये स्वयंपाकी म्हणून काम आहेत. याच स्टेडियममध्ये नीरजने तिरंदाजीचा सराव सुरू ठेवला. पण, कोरोनाच्या काळात वडिलांची नोकरी गेली आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही नीरज मागे हटला नाही आणि त्याने त्याच्या भावासोबत मिळेल ती कामे करुन कुटुंबाची जबाबदारी उचलण्याचे ठरवले. नीरजचा मोठा भाऊ सुनील चौहान बॉक्सर आहे. दोन्ही भावांनी मिळून कोरोनाच्या काळात भाजीपाल्याची गाडी लावून कुटुंब चालवले. 

केंद्रीय मंत्र्यांनी केली मदतया दोघांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही खेळाडूंना आर्थिक मदत केली होती. त्यानंतर नीरजची स्पोर्ट्स कोट्यातून ITBP मध्ये निवड झाली. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत स्पर्धेत निवड होणे, हा नीरज आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा नोव्हेंबरमध्ये जकार्ता येथे होणार आहेत. तर, एप्रिलमध्ये तुर्कीतील अँटालिया येथे विश्वचषक आणि जागतिक क्रीडा स्पर्धा यूएसए येथे होणार आहे. या तिन्ही स्पर्धांमध्ये नीरज भारताचे तिरंदाजीत प्रतिनिधीत्व करणार आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNeeraj Chopraनीरज चोप्रा