अमेरिकेची ओलिम्पिक लॉन्ग जंपर क्यूनेशा बर्क्सचा मॅकडॉनल्ड्स ते ओलिम्पिकपर्यंतचा प्रवास सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा आहे. बर्क्स 10 वर्षांपूर्वीपर्यंत मॅकडॉनल्ड्स रेस्टोरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होती. मात्र, ती आज ओलिम्पिक गेम्समध्ये अमेरिकेकडून पदकाची दावेदार आहे. बर्क्स 16 वर्षांची असताना आपल्या कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी मॅकडॉनल्ड्समध्ये काम करत होती. ती आपल्या छोट्या बहिणींची जबाबदारी सांभाळण्यासाठी कमी वयातच कामाला लागली होती. मात्र याच वेळी, मॅकडॉनल्ड्स आपले करिअर नाही, याची कल्पनाही तिला होती. (US long jump athlete quanesha burks used to work in mcdonalds and now an Tokyo Olympics)
बर्क्सचे आई-वडील विभक्त झाले होते. तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. कौटुंबिक जीवनातील चढ उतारांचा सामना करत बर्क्स घराचे बील भरत होती. आपल्या लहान बहिणींना शाळेत घेऊन जात होती आणि घरातील अनेक कामंही करत होती. एवढी बिझी असतानाही ती बास्केटबॉल्स गेम्समध्येही तेवढ्याच उत्साहाने भाग घेत. बास्केटबॉल खेळ अधिक चांगला व्हावा यासाठी बर्क्सने मिडल स्कूल दरम्यान धावणे सुरू केले. यानंतर, बास्केटबॉलमध्ये अनेक स्टेट चॅम्पिअनशिप्स खेळल्यानंतर बर्क्सचे कोच तिला म्हणाले होते, की तुला बास्केटबॉलमध्ये प्रचंड गती आहे. तू आपले करिअर रनिंगमध्ये करायला हवे.
एका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन
बर्क्सने सुरुवातीला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, तिने या खेळातील बारीकसारीक गोष्ठींची माहिती घेतल्यानंतर, या खेळाप्रती तिची रुची वाढली. विशेष करून तिला लॉन्ग जम्प अधिक आवडू लागले. खरे तर या खेळाच्या बाबतीत बर्क्सला फारशी माहिती नव्हती. मात्र, याच खेळासाठी तिला ओलंपिकचे तिकीट मिळाले.
बर्क्सला सुरुवातीला लॉन्ग जम्पदरम्यान वाळूत जम्प करणेही विचित्रच वाटायचे. तिला वाटायचे, की ती विनाकारणच आपले कपडले खराब करत आहे. मात्र, या खेलाप्रती अधिक माहिती घेतल्यानंतर तिचा इंट्रेस्ट अधिक वाढला. हाय स्कूलदरम्यान तिने 13 फुटांची जम्प मारली होती आणि सरासरी पेक्षा ती केवळ 3 इंचच दूर होती. यानंतर काही महिन्यांतच ती 20 फूटांपर्यंत जम्प करत होती.
Tokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक
वर्ष 2019 मध्ये यूएस आउटडोर ट्रॅक अँड फिल्ड चॅम्पिअनशिपपूर्वी तीच्या आजोबांचे निधन झाले होते. ती तिच्या आजोबांच्या खूप जवळ होती. त्यांच्या मृत्यूमुळे ती अत्यंत खचून गेली होती. तिची चॅम्पिअनशिपमध्येही भाग घेण्याची इच्छा नव्हती. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तिला या चॅम्पियनशिपसाठी तयार केले. बर्क्स म्हणते, की या घटनेमुळे मी मानसिकदृष्ट्या अत्यंत बलशाली झाले आहे.