ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि१४ - भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस जोडीने यूएस ओपन मध्ये ६-३, ६-३ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. त्यांनी अंतिम फेरीत श्वेदोव्हा (कझाकिस्तान)-कॅसी डेलाक्वा (ऑस्ट्रेलिया) या जोडीचा ६-३, ६-३ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला, विम्बल्डनपाठोपाठ अमेरिकन ओपनच्या महिला दुहेरीचं विजेतेपद पटकाण्याचा पराक्रम गाजवला आहे. सानिया-मार्टिनानं केवळ 70 मिनिटांत हा सामना जिंकला.
सानिया-मार्टिनाचं यंदाच्या वर्षातलं हे सलग दुसरं ग्रँड स्लॅम जेतेपद ठरलं. याआधी सानिया-मार्टिना जोडीनं विम्बल्डनच्या महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं. दरम्यान सानिया मिर्झाचं आपल्या कारकीर्दीतलं हे पाचवं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. सानियानं मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन, फ्रेन्च आणि अमेरिकन ओपन जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे.