- ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. 20 - जगातील सर्वांत वेगवान धावपटू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे जमैकाचा उसेन बोल्ट. उसेन बोल्टला हरवणं कठीण नाही तर अशक्यच आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एखादी रेस सहज जिंकणा-या उसेन बोल्टने पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकत धावपट्टीवरचा बादशहा आपणच असल्याचं सिद्ध केलं आहे.
जमैकाला 4 बाय 100 रिलेत सुवर्णपदक मिळाले असून यानिमित्ताने उसेन बोल्टने आपलं ट्रिपल ट्रिपल साजरं केलं आहे. या सुवर्ण पदकासोबतच सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकणारा उसेल बोल्ट पहिलाच अॅथलिट ठरला आहे. उसेन बोल्टच्या खात्यात तीन ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदकं जमा झाली आहेत. नऊ सुवर्णपदकं जिकंणारा आजवरचा चौथाच खेळाडू ठरण्याचा मानही उसेन बोल्टला मिळाला आहे.
बोल्टनं 2008 सालच्या बीजिंग, 2012 सालच्या लंडन आणि 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि फोर बाय हंड्रेड मीटरचं सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.
#JAM takes the #Gold in the Men's 4x100m and just like that @usainbolt ⚡️ takes the #TripleTriple! #Rio2016#Athletics— Rio 2016 (@Rio2016_en) August 20, 2016