अमेरिकेच्या एलिसन फेलिक्सने सोमवारी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील उसेन बोल्टची मक्तेदारी संपुष्टात आणली. फेलिक्सने दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 4 बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारात आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकून देताना उसेन बोल्टचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे 10 महिन्यांपूर्वी फेलिक्सला पुत्रप्राप्ती झाली होती. या सुवर्णपदकासह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक 12 सुवर्णपदकं जिंकण्याची कमाल केली आहे. यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्टच्या नावावर होता. 2017मध्ये बोल्ट अखेरचा या स्पर्धेत उतरला होता. त्याच्या नावावर 11 सुवर्णपदकं आहेत.
जागतिक स्पर्धेतील उसेन बोल्टची मक्तेदारी संपुष्टात; 10 महिन्यापूर्वी आई बनलेल्या धावपटूची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:15 PM