उत्तर प्रदेश-विदर्भ
By admin | Published: February 13, 2015 12:38 AM
उत्तर प्रदेशचे वर्चस्व
उत्तर प्रदेशचे वर्चस्वसी.के. नायडू क्रिकेट : विदर्भ बॅकफूटवर नागपूर : कानपूर येथे कमला क्लब मैदानावर खेळल्या जात असलेल्या २३ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या कर्नल सी.के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसऱ्या डावात ५३१ धावांची आघाडी घेत उत्तर प्रदेश संघाने विदर्भाला बॅकफूटवर ढकलण्याची कामगिरी चोख बजावली. गुरुवारी खेळ थांबला त्यावेळी उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात ४ बाद ४३२ धावांची दमदार मजल मारली होती. उत्तर प्रदेशकडे ५३१ धावांची आघाडी असून त्यांच्या ४ विकेट शिल्लक आहेत. उत्तर प्रदेशचा सलामीवीर अल्मास शौकतने नाबाद १८१ धावांची खेळी करीत विदर्भाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. शौकतच्या खेळीत २५ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे. अल्मास व कालचा नाबाद फलंदाज हिमांशू अस्नोरा (८२ धावा, २०५ चेंडू, १० चौकार, १ षटकार) यांनी चौथ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली. अखेर अक्षय कर्णेवारने अस्नोराला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मोहम्मद सैफ (६५ धावा, ४१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार) याने आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने अल्माससोबत पाचव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. झाहीद अली याने ३३ धावांचे योगदान दिले. गुरुवारी खेळ थांबला त्यावेळी शतकवीर शौकतला कुलदीप यादव (२३) साथ देत होता. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलकउत्तर प्रदेश पहिला डाव २६८. विदर्भ पहिला डाव १६९. उत्तर प्रदेश दुसरा डाव (कालच्या ३ बाद ८१ धावसंख्येवरून पुढे :- अल्मास शौकत खेळत आहे १८९, हिमांशू अस्नोरा झे. वाडकर गो. कर्णेवार ८२, मोहम्मद सैफ झे. शर्मा गो. चौधरी ६५, झाहीद अली झे. शर्मा गो. गुरबानी ३३, कुलदीप यादव खेळत आहे २५. अवांतर (२१). एकूण ११७ षटकांत ६ बाद ४३२. बाद क्रम : १-५४, २-६१, ३-६५, ४-२३८, ५-३३३, ६-३८४. गोलंदाजी : सिद्धेश नेरळ १०-४-३९-०, एस. बिंगेवार ११-१-४६-०, राज चौधरी २८-७-११९-३, कर्णेवार २२-४-६८-१, जितू शर्मा २४-५-७५-१, तुषार कडू ८-१-३९-०, आर.एन. गुरबानी १३-३-२५-१, अपूर्व वानखेडे १-०-५-०.