उज्बेकिस्तानच्या ग्रँडमास्टर याकुबोएव याने भारताची महिला ग्रँडमास्टर वैशालीसोबत हस्तांदोलन न केल्याने वाद निर्माण झाला आहे. याच याकुबोएवने गेल्यावर्षीच्या स्पर्धेत भारताच्या दिप्तीसोबत मात्र हात मिळविला होता. वैशालीने हा अपमान गिळला त्याला पराभूत करून घडल्या प्रकाराचा बदला घेतला आहे. आता वाद झाल्यावर याकुबोएवने परस्त्रीला स्पर्श करणे हा इस्लाम धर्माचा अपमान असल्याचे कारण सांगितले आहे. परंतू, याच महाशयाने गेल्यावर्षी एका परस्त्रीशी हस्तांदोलन केले होते, हे मात्र तो सपशेल विसरला आहे. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात याकुबोएव विरुद्ध चौथ्या फेरीच्या खेळाच्या सुरुवातीपूर्वी वैशाली हात पुढे करताना दिसत आहे. परंतू याकुबोएवने तिला हात दिला नाही, कोणतिही प्रतिक्रिया न देता तो खाली बसला. यामुळे वैशाली काहीशी अस्वस्थ झाली.परंतू, तिने हा अपमान सावरत खेळ सुरु केला व ०१९ मध्ये ग्रँडमास्टर बनलेल्या याकुबोएवला पराभवाची धूळ चारली. चेसबेसने याचा प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या याकुबोएवचा पराभव केल्यानंतर वैशालीने हँडशेक करण्यासाठी हात पुढे केला नाही. आठ फेऱ्यांनंतर वैशालीचे चार गुण आहेत. स्पर्धेत अजून पाच फेऱ्या खेळायच्या आहेत. तर याकुबोएवचे तीन गुण झाले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याकुबोएवने त्याच्या एक्स-अकाउंटवर पोस्ट करून माफी मागितली. वैशाली आणि तिचा धाकटा भाऊ आर प्रज्ञानंद यांचा आदर करतो, परंतु धार्मिक कारणांमुळे मी दुसऱ्या महिलेला स्पर्श करू शकत नाही.महिला आणि भारतीय बुद्धिबळपटूंबद्दल आदराने मी सर्वांना कळवू इच्छितो की मी धार्मिक कारणांसाठी इतर महिलांना स्पर्श करत नाही. भारतातील सर्वात बलवान बुद्धिबळपटू म्हणून मी वैशाली आणि तिचा भाऊ यांचा आदर करतो. जर माझ्या वागण्याने त्यांना दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे त्याने म्हटले आहे.