चेन्नई : ब्रॅँडन मॅक्युलमची (८१) दमदार खेळी आणि त्यानंतर रवींद्र जडेजा (४ बळी) आणि मोहित शर्मा (३ बळी) यांची टिच्चून गोलंदाजी, या जोरावर धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थानचा १२ धावांनी पराभव केला. याबरोबरच त्यांनी गेल्या सामन्यातील राजस्थानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला. तसेच चेन्नई सुपरकिंग्सने पहिल्या स्थानी झेप घेतली.चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सपुढे १५८ धावांचे आव्हान उभारले होते. प्रत्युत्तरात, राजस्थानने ९ बाद १४५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. राजस्थानच्या अजिंक्य रहाणे (२३) आणि शेन वॉटसन (२८) यांनी ३७ धावांची भागीदारी केली.स्मिथ (४), नायर (१०), हुडा (१५), फॉकनर (१६) हे टप्प्याटप्याने बाद होत गेले. जडेजा आणि मोहित शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांना तग धरता आला नाही. रजत भाटिया आणि अंकित शर्मा यांना तर भोपळाही फोडता आला नाही. राजस्थानच्या सॅमसनने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली. त्याआधी,घरच्या मैदानावर उतरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीच्या या निर्णयाला अंकित शर्माने धक्का दिला. अंकितने डावाच्या तिसऱ्या षटकात ड्वेन स्मिथला (६) फॉकनरकरवी झेलबाद केले.त्यानंतर आलेला धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाही अवघ्या ३ धावांवर तंबूत परतला. मॉरीसच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात तो फॉकनरकरवी झेलबाद झाला. या दोन धक्क्यांमुळे चेन्नई संघ ३.४ षटकांत २ बाद १५ धावा अशा संकटात सापडला होता. त्यानंतर एका बाजूने खंबीरपणे खेळणारा ब्रॅँडन मॅक्युलम आणि ड्युप्लेसिस ही जोडी जमली. सावध तसेच संयमी खेळ करीत मॅक्युलमने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यात त्याच्या ५ चौकार आणि २ षट्कारांचा समावेश होता.ब्राव्हो ‘कॅच’!नवव्या षटकातील रवींद्र जडेजाचा अखेरचा चेंडू. पाच चेंडूवर केवळ चारच धावा आल्याने ‘टेन्शन’मध्ये आलेल्या शेट वॉटसनने उत्तुंग फटका मारला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या ड्वेन ब्राव्होने उंच झेप घेत एका हातात हा अप्रतिम झेल टिपला. अशक्यप्राय असा हा झेल टिपताना पाहताच उपस्थितांच्या तोंडून ‘ब्राव्हो.. कॅच’ असे शब्द बाहेर पडले. हाच झेल टर्निंग पॉर्इंटसुद्धा ठरणारा होता.धा व फ ल कचेन्नई सुपरकिंग्ज : ड्वेन स्मिथ झे. फॉल्कनर गो. अंकित शर्मा ६, ब्रँडन मॅक्युलम झे. अंकित शर्मा गो. मॉरिस ८१, सुरेश रैना झे. फॉल्कनर गो. मॉरिस ३, फाफ ड्युफ्लेसिस धावचित (शेन वॉटसन) २९, पवन नेगी झे. स्टीव्हन स्मिथ गो. मॉरिस २, महेंद्रसिंग धोनी नाबाद १३, ड्वेन ब्राव्हो नाबाद १५. अवांतर ८, एकूण २० षटकांत ५ बाद १५७.गडीबाद क्रम : १-१२, १-१५, ३-११६, ४-१२९, ५-१२९. गोलंदाजी : मॉरिस ४-०-१९-३, वॉटसन २-०-१९-०, अंकित शर्मा ४-०-३१-१, प्रवीण तांबे ३-०-२४-०, फॉल्कनर ४-०-४०-०, भाटिया ३-०-२३-०राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे झे. ब्राव्हो गो. मोहित शर्मा २३, शेन वॉटसन झे. ब्राव्हो गो. जडेजा २८, स्टीव्हन स्मिथ त्रिफळा गो. जडेजा ४, कुलदीप नायर झे. अश्विन गो. जडेजा १०, दीपक हुडा झे. रैना गो. जडेजा १५, संजू सॅमसन झे. स्मिथ गो. ब्राव्हो २६, फॉल्कनर झे. ब्राव्हो गो. मोहित शर्मा १६, मॉरिस नाबाद १६, रजत भाटीया झे. फाफ ड्युफ्लेसिस ०, अंकित शर्मा झे. नेहरा गो. ब्राव्हो ०, प्रवीण तांबे नाबाद १. अवांतर ६, एकूण २० षटकांत ९ बाद १४५.गडी बाद क्रम १-३७, २-४८, ३-६३, ४-७५, ५-९०, ६-१२३, ७-१३०, ८-१३०, ९-१४३गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२०-०, मोहित शर्मा ४-०-२५-३, पवन नेगी ४-०-३५-०, रवींद्र जडेजा ४-०-११-४, ड्वेन ब्राव्हो ४-०-४३-२.
चेन्नईकडून वचपा!
By admin | Published: May 11, 2015 2:46 AM