- प्रीती भानुशाली पटेलफिटनेस एक्सपर्ट (रिलॅक्स झील)आ पले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आता विविध पर्याय उपलब्ध आहेत आणि त्याची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात झुंबा फिटनेस, बॉलीवूड, भांगडा क्लासेस, फंक्शनल वर्कआऊटस्, टबाटा, बॉडी वेट वर्कआऊट, क्रॉॅस फिट ट्रेनिंग, बॉडी बॅलन्स वर्कआऊटस्, विविध प्रकारचे योगा क्लासेस, पिलेटस् या फिटनेस प्रकारांचा समावेश आहे. जुन्या पद्धतीने व्यायाम केल्यास फायदा होतो; पण लोकांना आता लवकर रिझल्ट हवा आहे. त्यामुळे कोरिओग्राफड फिटनेस प्रोग्राम लोकप्रिय होत आहे.आता अद्ययावत संगीत, प्रभावी लाईट, भव्य स्टुडिओ आणि प्रशिक्षित शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाते व फिटनेस प्रोग्रामच्या माध्यमातून शरीराची तथा आरोग्याची यथावत काळजी घेतली जाते. या सर्व प्रकारामुळे तंदुरुस्त शरीर प्राप्त होऊन आनंददायी आणि प्रसन्न वाटते.एकाहून अधिक प्रकारचेफिटनेस प्रोग्रामच्या सहज उपलब्धतेमुळे त्याची लोकप्रियता अधिक वाढलेली आहे. संमिश्रआणि समतोल व्यायाम तंदुरुस्त शरीरासाठी करणे आवश्यक आहे, ज्यात योगा, शारीरिक कायाकल्प आणि इतर उपक्रमांचा समावेश असू शकतो.विविध अशा अभिनव उपक्रमाचे संमिश्र स्वरूप आता असे क्लासेस आपल्यासाठी खास घेऊन आलेले आहे. नृत्य, योगा, शारीरिक कायाकल्प, आधुनिक तंत्रज्ञान, पायलेटस, जिम आणि इतर काही विशेष प्रकारचे प्रशिक्षण क्लासेसमध्ये प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रदान केले जात आहे; परंतु त्याचा अतिरेक होता कामा नये. अमर्यादित तसेच प्रभावी असे अभिनव उपक्रम उपलब्ध आहेत, त्यासाठीचे असंख्य पर्यायही तुमच्यासाठी खुले आहेत.
फिटनेससाठी विविध पर्याय उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 4:13 AM