राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महिलांना सांघिक टेटेमध्ये सुवर्ण; रोहित हवालदार, आकांक्षा व्होरा, तुषार गिते यांना रौप्य तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे व आदिती घुमटकरने अनुक्रमे पुरुष व महिलांच्या जलतरण प्रकारात ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकून वेगवान जलतरणपटूचा मान मिळविला.पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेने २३.०० सेकंदाची वेळेची नोंद करून नवीन विक्रम प्रस्थापित केला. विरधवलने २०११ मध्ये झालेला २३.०८ सेकंदाचा विक्रम मोडित काढला. महिलांच्या ५० मिटर फ्रिस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या आदिती घुमटकरने २६.९० वेळेची नोंद करून नवीन विक्रमासह सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. अदितीने कनॉटकच्या शिखा टंडनने २००७ मध्ये केलेल्या २७.२४ सेकंदाचा विक्रम मोडित काढला. महाराष्ट्राच्या अवंतिका चव्हाणला २७.३६ वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. हरियाणाच्या शिवानीने रौप्यपदक जिंकले. महिलांच्या वैयक्तिक मिडले प्रकारात महाराष्ट्राच्या आकांक्षा व्होराने ५:१४.७२ वेळेची नोंद करून रौप्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. (वृत्तसंस्था)टेबल टेनिसमहाराष्ट्राच्या मधुरिका पाटकर, पुजा सहस्त्रबुद्धे, चार्वी राजकुमार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प. बंगाल संघाचा ३-१ गेमने पराभव केला. अंतिम सामन्यात पुजा सहस्त्रबुद्धे व मधुरिका पाटकरने अनुक्रमे अंकिता दास व मौमा दास यांचा पराभव केल्यानंतर चार्वी राजकुमारला कृत्विका सिंहारॉयकडून पराभव पत्कारावा लागला. चौथ्या एकेरीत पुजा सहस्त्रबुद्धेने अप्रतिम खेळ करत ३-२ गेमने पराभूत करून सुवर्णपदक आपल्या संघाला मिळवून दिले.डायव्हिंग हायबोर्ड डायव्हिंगमध्ये महाराष्ट्राच्या तुषार गितेने ३२१ गुण संपादन करून रौप्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. केरळच्या सिद्धार्थ परदेशीने २०४ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. महिला कुस्ती महाराष्ट्राच्या (मुळची मुरगुड) नंदिनी साळोेखेने महिलांच्या ४८ किलो गटात पंजाबच्या प्रीतीला पराभूत करुन रौप्यपदक जिंकले.बीच हॅण्डबॉल महाराष्ट्र महिला सरस गुणांवर उपांत्यफेरीत महाराष्ट्राच्या महिला संघाला बिहारकडून २०-२२ गुणांनी पराभू पत्करावा लागला. पराभूत होूनही महाराष्ट्राच्या महिलां संघाने सरस गुणांवर उपांत्यफेरीत प्रवेश केला.बुधवारी त्यांची लढत छतीगडविरुद्ध होणार आहे. मंगळवारी झालेल्या केरळविरुद्ध महाराष्ट्राच्या महिलांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शअन करुन २६-२० गुणांनी विजय नोदंविला. याविजयामुळे महाराष्ट्राचा संघ उपांत्यफेरीत पोहोचला. निकाल : टेबल-टेनिस : महिला सांघिक अंतिम : महाराष्ट्र वि. वि. पश्चिम बंगाल ३-१ (पूजा सहस्रबुद्धे वि. वि. अंकिता दास ११-६, ११-६, ११-५; मधुरीका पाटकर वि. वि. मौमा दास ११-७, ६-११, १३-११, १२-१०; चार्वी राजकुमार पराभूत वि. कृत्विका सिंहारॉय ११-८, १२-१०, ६-११, ५-११, ९-११; पूजा सहस्रबुद्धे वि. वि. मौदा दास ११-६, ६-११, ११-१३, ११-७, ११-६) (उपांत्यफेरी) : महाराष्ट्रा वि. वि. तामिलनाडू ३-२ (मधुरीका पाटकर वि . वि. अमृता पुष्पक ११-७, ८-११, ११-५, ११-५; पूजा सहस्रबुद्धे वि. वि. के. शामिनी १०-१२, ६-११, ११-९, ११-१, ११-५; चार्वी राजकुमार पराभूत वि. विद्या एन. ८-११, ६-११, ११-८, ५-११; मधुरीका पाटकर पराभूत वि. के. शामिनी ११-६, ७-११, ९-११, ११-९, ७-११; पूजा सहस्रबुद्धे वि. वि. अमृता पुष्पक ११-६, ९-११, ११-९, ११-९); मंजिल और बस दो कदम दूर...महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघानी ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेअंतर्गत खो-खो स्पर्धेची उपांतय फेरी गाठली. महाराष्ट्राचे संघ अपेक्षेप्रमाणे गटविजेते ठरले. ही स्पर्धा थिरूअनंतपूरम येथील श्रीपादम स्टेडिअम येथे सुरू आहे.आज झालेल्या सामन्यांत महाराष्ट्राच्या पुरूष संघाने पश्चिम बंगालचा (१७-४, ०-७), १७-११ असा १ डाव व ६ गुणांनी दणदणीत पराभव केला. दिपेश मोरेचा (३.२० मि) उभेद्य बचाव व अमोल जाधवचे (६ गडी) झंजावाती आक्रमण या सामन्यातील उल्लेखनीय बाबी होत्या. युवराज जाधव (२.४०मि व ४ गडी) व मयुरेश साळुंके (१.२०मि व ३ गडी) यांनी देखील चमकदार खेळ केला.महिलांनी गटातील शेवटच्या सामन्यात कर्नाटकावर (९-२, ०-३), ९-५ अशी १ डाव व ४ गुणांनी मात केली. मध्यंतराला विजयी संघाकडे ७ गुणांची आघाडी होती. श्रुती सकपाळ (३.४०मि), सारिका काळे (२.५०मि), प्रियांका येळे (२.३०मि नाबाद), सुप्रिया गाढवे (३मि नाबाद), पौर्णिमा सकपाळ ( २.४०मि व १ गडी), ऐश्वर्या सावंत (२.२० मि व १ गडी), शिल्पा जाधव (३ गडी) या विजयाच्या प्रमुख शिल्पकार होत्या. विजया नंतर प्रतिक्रीया देताना महाराष्ट्राचा पुरूष संघाचा कर्णधार नरेश सावंतने, खेळाडूंची संरक्षणात वैयक्तिक तसेच आक्रमणात सांघि कामगिरी जबरदस्त होत आहे असे सांगितले. उपांत्य फेरीत महिला गटात महाराष्ट्राची लढत पश्चिम बंगाल बरोबर होईल, तर पुरुषांची कर्नाटकबरोबर होईल.उद्घाटनाच्या खर्चावर थॉमसन नाराज तिरुवनंतपूरम : राज्यात आयोजित ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमावर केलेल्या भरमसाठ खर्चावर केरळचे मुख्य सचिव जी़ जी़ थॉमसन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़ भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे माजी सरचिटणीस राहिलेले थॉमसन म्हणाले, या स्पर्धेच्या उद्घाटनावर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला़ ही खेदजनक बाब आहे़ जर योग्य प्रकारे व्यवस्थापन झाले असते, तर स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमावरील खर्च वाचविता आला असता़ आयओए देणार दोन लाख रुपयेतिरुअनंतपुरम : भारतीय आॅलिम्पिक महासंघाने महाराष्ट्राचा नेटबॉल खेळाडू मयूरेश पवारच्या कुटुंबीयाला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. मयूरेशचे सोमवारी समुद्रात बुडून निधन झाले. आयओएचे महासचिव राजीव मेहता म्हणाले, ‘‘आम्ही मयूरेशचे आई, वडील आणि कुटुंबीयाप्रति संवेदना व्यक्त करतो. मयूरेशच्या आत्माला शांती मिळो आणि त्याच्या कुटुंबीयाला या भरून न निघणाऱ्या हानीतून सावरण्याची शक्ती द्यावी, अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. आयओएतर्फे शोकाकुल कुटुंबीयांना दोन लाख रुपये देण्यात येतील.’’ मयूरेश पवारचा बीचवर बुडून मृत्यू झाला. सराव सत्रानंतर तो षणमुगम बीचवर छायाचित्र काढण्याच्या प्रयत्नात पाण्यात पडला. सुरुवातीला त्याला हृदयविकाराचा झटका आला असे वाटत होते, पण शवविच्छेदनानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.मोहनलाल परत करणार मानधनतिरुवनंतपूरम : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचा फ्लॉप शो झाल्यानंतर मल्याळम सुपरस्टार मोहनलाल याने राज्य सरकारकडून मिळालेले मानधन परत करण्याचा निर्णय घेतला आहे़ राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा अभिनेता म्हणाला की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या फ्लॉप शोनंतर माझ्यावर चोहोबाजंूनी टीका होत आहे़