शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

वेगाचा बादशहा उसैन बोल्टला बनायचं होत क्रिकेटर पण तो बनला धावपटू

By admin | Published: August 21, 2016 2:54 PM

सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करिअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट

पवन देशपांडे / ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : किराणा दुकानात बसणं, फावल्या वेळात क्रिकेट एके क्रिकेट खेळणं. आयुष्याचं ध्येय काय? तर वकार युनुससारखी बॉलिंग जमायला हवी. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम. अन् फास्ट बॉलर व्हायचं हे स्वप्न. सचिन तेंडुलकर अन ख्रिस गेल हे दोघे आवडते क्रिकेटपटू. गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा अन् फास्ट बॉलिंग करायचा. फुटबॉलही त्याचा जीव की प्राण. आजही त्याला कोणी जर फुटबॉलची ऑफर केली तर तो नाही म्हणू शकणार नाही. पण तो बनला धावपटू. सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करिअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट.रिओ ऑलिम्पिकमध्ये ठरवलेली यशाची शिखरं सहज सर केल्यानंतर बोल्टने स्पर्धात्मक खेळांतून निवृत्ती जाहीर केली आहे. रिओ ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वी बोल्टने म्हंटले होते की, तो आपल्या शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये ह्यस्प्रिंट स्वीपह्ण करण्याचे त्याचे स्वप्न आहे. बोल्टने येथे १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय ४00 रिलेचे सुवर्णपदक जिंकले आहे. या तिन्ही शर्यतीत बीजींग आणि लंडन ऑलिम्पिकनंतर सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक हॅटट्रीक आहे. जाणून घेऊयात बोल्टबद्दल..बोल्ट जन्मला तो प्रदेश जंगलाचा़ जमैकातलं शेरवूड कंटेंट हे त्याचं जुळं शहऱ त्याला एक बहीण अन् एक भाऊ़ त्याच्या वडिलांचे ग्रामीण भागात छोटं किराणा दुकान होतं. बोल्टला क्रिकेटची जास्त आवड होती़ सचिन तेंडुलकर, ख्रिस गेलचा तो चाहता होता आणि वकार युनुससारखी बॉलिंग त्याला करायची होती़ पण ज्या शाळेत तो गेला तिथं त्याला धावण्याची संधी मिळाली आणि तो त्यात पहिला आला़ करिअरला कलाटणी मिळण्यासाठी एवढी स्पर्धा पुरेशी ठरली़ त्यानंतर तो कधीच थांबला नाही़ त्याचा सराव एवढा अवघड असतो की सर्वसामान्यांनी त्याचा विचारही करू नये. तो जेव्हा धावतो तेव्हाच त्याच्या अंगातील क्षमता दिसून येते़ सारे धावपटू काही मीटरवर मागे असताना हा फिनिशिंग लाइनला पोहोचलेला असतो आणि बाजूला हसून बघत असतो़ घरातला लाडका होता आणि घरचे म्हणतील तसं ऐकायचा़ त्यामुळं त्याला फारशा वाईट सवयी लागल्या नाहीत, असं म्हणतात़ पण त्याच्यावर कायमच डोपिंगचा आरोप होत आला आहे़ जेव्हा जेव्हा त्यानं विक्रम प्रस्थापित केला तेव्हा तेव्हा त्यानं उत्तेजकं घेतल्याचे आरोप झाले आहेत़ पण त्यानं तो अजिबात डगमगला नाही़ कारण ह्यह्यज्या गावीच जायचे नाही त्याबाबत विचार तरी कशाला करायचाह्णह्ण, असं तो म्हणतो़ त्याचे प्रशिक्षक ग्लेन मिल्सही अशा उत्तेजकांच्या विरोधात होते़ त्यांनी डोपिंग चाचणी करणाऱ्यांनाही आव्हान दिलं होतं. बोल्टच्या सगळ्या टेस्ट तुम्ही घेऊ शकता, तो उत्तेजकं घेत नसल्याचंच सिद्ध होईल, असं ग्लेन यांनी एकदा म्हटलंही होतं. ऑलिम्पिकच्या आधी बोल्टच्या चार चाचण्या झाल्या आणि ज्या पदार्थांवर बॅन आहे असे कोणतेही उत्तेजक पदार्थ त्याच्या शरीरात आढळले नाहीत़ आम्ही मेहनत करतो़ ती पण जिवापाड़ अशा गोष्टींवर अवलंबून राहत नाही़ तुम्ही कोणत्याही क्षणी आमची चाचणी घ्या, असं बोल्टने स्पष्ट केलं होतं डोपिंगच्या चुकीच्या बातम्यांमुळे बोल्टला आपला प्रायोजकही गमवावा लागला़ पण त्याला फारसा फरक पडला नाही़ कारण बाकी प्रायोजक रांगेत उभे होतेच़ बोल्ट आता खेळताना दिसणार नाही. धावण्याच्या शर्यतीत बोल्टला पाहता येणार नाही पण, या त्याने गाठलेली शिखरं पार करणं हेच पुढील पिढीसाठी आव्हान असेल़

बोल्ट ४०० कोटींचा मालक

 

सुवर्णपदकं कमी जिंकूनही बोल्टला मिळणाऱ्या जाहिरातदार कंपन्यांचे काँट्रॅक्ट अधिक आहेत़.  प्युमासारखी कंपनी बोल्टसाठी जवळपास ९० लाख डॉलर खर्च करते़ दरवर्षी तो १३० कोटी रुपयांची कमाई करतो आणि सध्या त्याच्याकडे सुमारे ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे़ .