शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

वेगाचा बादशहा थांबला, सुवर्णपदकासह बोल्टची निवृत्ती

By admin | Published: August 20, 2016 9:13 PM

जगातील सर्वात वेगवान धावपटू जमैकाच्या उसेन बोल्टने रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीचे सुवर्णपदक पटकावत कारकिर्दीला सोनेरी रामराम केला आहे.

शिवाजी गोरे

रिओ दि जानेरो, दि. २० - जगातील सर्वात वेगवान धावपटू, अविश्वसनीय अ‍ॅथलिट आणि स्वत:ला ‘दिग्गज’ संबोधणारा जमैकाच्या युसेन बोल्टने आपले स्वप्न पूर्ण करताना रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीचे सुवर्णपदक पटकावत कारकिर्दीला सोनेरी रामराम केला आहे.रिओ आॅलिम्पिक सुरु होण्यापूर्वी बोल्टने म्हंटले होते की, तो आपल्या शेवटच्या आॅलिम्पिकमध्ये ‘स्प्रिंट स्वीप’ करण्याचे त्याचे स्वप्न आहे. बोल्टने येथे १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय ४00 रिलेचे सुवर्णपदक जिंकले आहे. या तिन्ही शर्यतीत बीजींग आणि लंडन आॅलिम्पिकनंतर सलग तिसऱ्यांदा आॅलिम्पिक हॅटट्रीक आहे. दोन दिवसापूर्वीच वयाची तिशी गाठलेल्या बोल्टचे हे सलग तिसरे आणि एकूण नववे सुवर्णपदक आहे.जगातील सर्वात वेगवान पुरुष अशी उपाधी मिळवलेल्या बोल्टने जमैकाचे नेतृत्त्व करताना ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. जमैका संघाने ३७.२७ सेकंदाची वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले. धावपट्टीचा बादशहा बोल्टने आपल्या संघासाठी शेवटची धाव घेतली आणि सुवर्णपदक पटकावले.सुवर्णपदकासह निवृत्ती घेणारा बोल्ट म्हणाला, आता मी दिग्गज आहे, असे मी म्हणू शकतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्याने मी आता समाधानी आहे. मी खूप आनंदीत असून स्वत:चा मला अभिमान वाटत आहे. माझ्यावर मोठा दबाव होता.