शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

वेंगसरकर यांनी उपाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

By admin | Published: January 05, 2017 2:25 AM

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिलेल्या दणक्यानंतर संलंग्न राज्य संघटना हादरले असताना मुंबई क्रिकेट संघटनेतही (एमसीए) बदल होण्यास सुरुवात झाली

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिलेल्या दणक्यानंतर संलंग्न राज्य संघटना हादरले असताना मुंबई क्रिकेट संघटनेतही (एमसीए) बदल होण्यास सुरुवात झाली. एमसीएचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.विशेष म्हणजे बुधवारीच, मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) चेअरमन ज्योतिरादित्य शिंदे आणि अध्यक्ष संजय जगदळे यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर वेंगसरकर यांनीही आपला राजीनामा दिला. वेंगसरकर यांनी २००२ ते २०१० या काळात एमसीए उपाध्यक्षपदी होते. २०११ साली अध्यक्षपदाच्या निवडणूकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरुध्द वेंगसरकर पराभूत झाले होते. यानंतर ते चार वर्षांनी पुन्हा एमसीएत उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. एमसीएला एका पत्राद्वारे वेंगसरकर यांनी कळविले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मी एमसीएच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.’ याआधी १७ डिसेंबरला जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. (प्रतिनिधी)