शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

जिल्हा कॅरम स्पर्धेत अनुभवी दिलेश खेडेकरची आगेकूच

By admin | Published: July 15, 2016 9:29 PM

मुंबई उपनगरच्या खान साहेबचा २५-०, २५-१७ असा पराभव करुन जेव्हीपीजी पहिल्या संयुक्त जिल्हा कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - माजी राज्य विजेता मुंबईच्या दिलेश खेडेकरने मुंबई उपनगरच्या खान साहेबचा २५-०, २५-१७ असा पराभव करुन जेव्हीपीजी पहिल्या संयुक्त जिल्हा कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबई उपनगरच्या प्रणव जाधवने मुंबईच्या हितेंद्र पटेलला नमवत बाजी मारली.जुहू विलेपार्ले जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दिलेशने आपल्या अनुभवाच्या जोरावर एकहाती वर्चस्व राखले. पहिला गेम निर्विवादपणे जिंकल्यानंतर दिलेशला खान साहेबकडून काहीप्रमाणात झुंज मिळाली. मात्र सामन्यावरील पकड निसटू न देता दिलेशने सलग दोन गेम जिंकताना सहज बाजी मारली. दुसरीकडे तीन गेममध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या प्रणव जाधवने मुंबई शहरच्या हितेंद्र पटेलचा २५-१२, ७-२५, २५-४ असा पराभव केला. पहिला गेम जिंकल्यानंतर प्रणवला हितेंद्रच्या आक्रमक खेळाला सामोरे जावे लागले. सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर झालेल्या निर्णायक तिसऱ्या गेममध्ये प्रणवने हितेंद्रला फारशी संधी न देता विजयावर शिक्का मारला.पालघरच्या सचिन पवारने सलग दोन गेम जिंकताना मुंबई शहरच्या कुलदीप वाघधरेचा २५-१५, २५-१२ असा पराभव केला. अन्य एका सामन्यात ठाण्याच्या वरुण गोसावीने एकहाती वर्चस्व राखताना मुंबई शहरच्या प्रितम पुराडकरचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)