शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दिग्गजांची निवृत्ती चटका लावणारी

By admin | Published: August 22, 2016 4:45 AM

जलतरणपटू मायकल फेल्प्स यांनी आजतागयत पटकावलेल्या आॅलिम्पिक सुवर्णपदकांमुळे आॅलिम्पिकचे चित्रच बदलले आहे.

रिओ : वेगवान धावपटू उसेन बोल्ट आणि महान जलतरणपटू मायकल फेल्प्स यांनी आजतागयत पटकावलेल्या आॅलिम्पिक सुवर्णपदकांमुळे आॅलिम्पिकचे चित्रच बदलले आहे. रिओत क्रीडा महाकुंभामध्ये अखेरचा सहभाग नोंदवणाऱ्या या दोन महान खेळाडूंची निवृत्ती चटका लावून जाणारी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी या दोन्ही खेळाडूंना ‘महानायक’ संबोधले आहे, पण ३१ व्या आॅलिम्पिकच्या समारोपानंतर त्यांची उणीव कशी भरून काढायची हा विचार नक्कीच त्यांच्या मनाला शिवून जाईल. ३० वर्षीय बोल्टने ९ तर ३१ वर्षीय फेल्प्सने २३ सुवर्णपदके पटकावली आहेत. शनिवारी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना बाक म्हणाले,‘आम्ही असे खेळाडू बघितले आहेत की ते येथे येण्यापूर्वीच महानायक ठरले होते. त्यांनी आपले हे पद अधिक अढळ केले. त्यात मायकल फेल्प्स व उसेन बोल्ट यांचा समावेश आहे.’या दोन्ही खेळाडूंनी पदार्पणाच्या स्पर्धेपासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. १५ वर्षांच्या फेल्प्सने २००० च्या सिडनी आॅलिम्पिकमध्ये प्रथमच सहभाग नोंदवला होता तर १७ वर्षांच्या बोल्टने २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये २०० मीटरच्या दौड शर्यतीत हिटमध्ये पाचवे स्थान पटकावले होते. अथेन्स आॅलिम्पिकमध्ये फेल्प्सने चमकदार कामगिरी करताना सहा सुवर्णपदके आणि दोन कांस्य पदके पटकावताना मार्क स्प्ट््िजच्या सात जेतेपदाच्या विक्रमाला आव्हान दिले होते. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये फेल्प्सने जलतरणात सर्व ८ स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावित इतिहास नोंदवला तर बोल्टने तेथे १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवताना बडर्््स नेस्ट स्टेडियममध्ये चाहत्यांचे लक्ष वेधले होते. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये बोल्टने पुन्हा एकदा तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली तर फेल्प्सने आपल्या खात्यात आणखी चार सुवर्णपदकांची भर घातली. रिओमध्ये पाच सुवर्णपदके पटकावताना अमेरिकन जलतरणपटूने २३ सुवर्णपदकांसह आपल्या पदकांची एकूण संख्या २८ केली तर बोल्टने पुन्हा तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावण्याची कामगिरी केली. बोल्टच्या नावावर आॅलिम्पिकमध्ये ९ सुवर्णपदकांची नोंद आहे.बोल्टने म्हणाला, ‘मी महान खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे.’ फेल्प्स म्हणाला,‘एक खेळाडू म्हणून मी यापूर्वी जे कुणाला करता आले नाही, असे लक्ष्य ठरवले होते. आज मी माझ्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यात मी यशस्वी झाल्याचे वाटते.’>आॅलिम्पिकचे ‘बादशाह’मायकल फेल्प्स२००४ अथेन्स ६ सुवर्ण, २ कांस्य२००८ बीजिंग ८ सुवर्ण२०१२ लंडन ४ सुवर्ण, २ रौप्य२०१६ रिओ५ सुवर्ण, १ रौप्य>उसेन बोल्ट२००८ बीजिंग३ सुवर्ण२०१२ लंडन ३ सुवर्ण२०१६ रिओ ३ सुवर्ण