मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क, श्रीलंकेचे कुमार संगकारा व माहेला जयवर्धने, पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह-उल-हक आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी तसेच झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेन्डन टेलर या दिग्गज खेळाडूंनी विश्वकप स्पर्धेच्या समारोपानंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. क्लार्कने विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली तर मिस्बाह व आफ्रिदी यांनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वन-डे क्रिकेटला गुडबाय केले. माहेला व संगकारा या श्रीलंकन जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीनंतर वन-डे क्रिकेटला अलविदा केला. श्रीलंकेच्या या दोन्ही माजी कर्णधारांनी विश्वकप स्पर्धेनंतर निवृत्ती स्वीकारणार असल्याचे पूर्वीच जाहीर केले होते. झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेन्डन टेलरने साखळी फेरीनंतर निवृत्ती जाहीर केली. झिम्बाब्वे संघाला विश्वकप स्पर्धेत बाद फेरी गाठण्यात अपयश आले. संगकाराने विश्वकप स्पर्धेत सात सामन्यांत ५४१ धावा फटकावल्या. या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे तर टेलर ४३३ धावांसह चौथ्या स्थानी आहे. मिस्बाहने ३५० धावा फटकावल्या असून, तो दहाव्या स्थानी आहे. अंतिम लढतीत ७४ धावांची खेळी करणारा क्लार्क २१९ धावांसह ३८व्या स्थानी आहे. आफ्रिदीला (११६ धावा व २ बळी) विशेष छाप पाडता आली नाही.
दिग्गजांची निवृत्ती चटका लावून गेली
By admin | Published: March 29, 2015 11:58 PM