दिल्ली : न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा मुख्य प्रशिक्षक आहे. व्हेटोरीच्या नावाचा टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून विचार करा, असे स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने सुचविले आहे. आरसीबीचा कर्णधार असलेल्या कोहलीने धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी क्रिकेटची धुरा सांभाळली आहे. तोच आरसीबीचा कर्णधार असल्याने व्हेटोरीला तो चांगला ओळखतो. ग्रेग चॅपेल आणि गॅरी कर्स्टन या विदेशी प्रशिक्षकांनंतर व्हेटोरी हे प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावतील, असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना कोहलीने हे मत व्यक्त केले. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून यावर कुठलीही चर्चा झालेली नाही. येत्या जून ते मार्च २०१७ दरम्यान भारतीय संघ १८ कसोटी सामने खेळणार आहे. भारताचे हे वेळापत्रक ‘बिझी’ आहे. त्यामुळे अशा वेळी भारतीय संघासाठी प्रशिक्षकाची निवड केली जाऊ शकते, असे संकेतही बीसीसीआयकडून मिळत आहेत.
व्हेटोरीला विराटची पसंती
By admin | Published: May 09, 2016 10:47 PM