शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

मुंबईकरांचा दणदणीत विजय

By admin | Published: November 09, 2016 4:39 AM

गतविजेत्या मुंबईने रेल्वेकडून मिळालेले अवघे २४ धावांचे लक्ष्य एकही फलंदाज न गमावताना सहजपणे साध्य करुन रणजी ट्रॉफी स्पर्धेत १० विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला.

म्हैसूर : गतविजेत्या मुंबईने रेल्वेकडून मिळालेले अवघे २४ धावांचे लक्ष्य एकही फलंदाज न गमावताना सहजपणे साध्य करुन रणजी ट्रॉफी स्पर्धेत १० विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. या दणदणीत विजयासह मुंबईकरांनी बोनस गुणाच्या कमाईसह ७ गुणांची वसूली करत ‘अ’ गटात पुन्हा एकदा अग्रस्थान मिळवले आहे.पहिल्या डावात रेल्वेला १८५ धावांनी पिछाडीवर टाकल्यानंतर मुंबईने रेल्वेला दुसऱ्या २०८ धावांमध्ये गुंडाळले. यासह मिळालेले २४ धावांचे लक्ष्य मुंबईने अवघ्या ५ षटकात एकही फलंदाज न गमावता पार केले. अखिल हेरवाडकरने १४ चेंडूत ४ चौकारासह नाबाद १८ धावा फटकावल्या. तर, श्रेयश अय्यरने १६ चेंडूत एका चौकारासह नाबाद ६ धावा काढल्या. तत्पूर्वी, चौथ्या दिवशी रेल्वेने ४ बाद १३५ धावांवरुन सुरुवात केली. युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने टिच्चून मारा करीत रेल्वेच्या फलंदाजांना तंबूतला रस्ता दाखवला. त्याने केवळ ३५ धावांत ५ बळी घेत रेल्वेच्या आव्हानातली हवा काढली. तसेच, पहिल्या डावात रेल्वेचा कर्दनकाळ ठरलेल्या विजय गोहिलने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. रेल्वेकडून सौरभ वाकसकर (३९), अरिंदम घोष (३१), फैझ अहमद (२८) आणि आशिष यादव (२६) यांनीच थोडाफार प्रतिकार केला. तुषारच्या भेदकतेपुढे रेल्वेचा डाव ९२.१ षटकात २०८ धावांमध्ये संपुष्टात आला. यासह मुंबईने ‘अ’ गटात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावताना बोनस गुणासह सर्वाधिक १९ गुणांची मिळवले आहेत. मुंबईचा पुढील सामना १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान उत्तर प्रदेश विरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)मुंबई (पहिला डाव) : १३३.२ षटकात सर्वबाद ३४५ धावा.रेल्वे (पहिला डाव) : ७०.३ षटकात सर्वबाद १६० धावा (कर्ण शर्मा २४, आशिष सिंग २२; विजय गोहिल ५/६४)रेल्वे (दुसरा डाव) : ९२.१ षटकात सर्वबाद २०८ धावा (सौरभ वाकासकर ३९, अरिंदम घोष ३१; तुषार देशपांडे ५/३५) मुंबई (दुसरा डाव) : ५ षटकात बिनबाद २४ धावा (अखिल हेरवाडकर नाबाद १८, श्रेयश अय्यर नाबाद ६)