ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. 7 - कोलकाता नाइट रायडर्सनं 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 6 गडी राखून 15 षटकांत 159 धावा करत शानदार विजय मिळवला आहे. कोलकातानं अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूला घरच्याच मैदानावर पराभवाची धूळ चारली आहे. नारायणनं 17 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 54 धावा करत अर्धशतक साजरं केलं आहे. कोलकाताकडून लीननंही 22 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत 50 धावा करत शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र चौधरीनं नारायणचा बळी घेऊन त्याला माघारी धाडलं. तर चहलनं गंभीर, नेगीनं लिन आणि ग्रँडहोमचा बळी मिळवला आहे.तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी काहीशी डळमळीत होती. या सीरिजमध्ये बंगळुरूच्या फलंदाजांनी फारशी कमाल दाखवली नाही. सामन्याच्या पहिल्या चेंडूत बंगळुरूचा ख्रिस गेल झेलबाद झाला. सुरुवातीच्या काही बळीनंतर मात्र ट्रॅव्हिस आणि मनदीप सिंगच्या जोडीनं बंगळुरूच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. ट्रॅव्हिस आणि मनदीपनं फलंदाजीच्या जोरावर चांगली भागीदारी करत बंगळुरूचा डाव सावरला. मात्र तरीही त्यांच्या पदरी निराशाच आली. सुनील नारायणने आयपीएल इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने केवळ 15 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणने केला होता. युसूफनेही 15 चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं होतं.
कोलकाताचा बंगळुरूवर दणदणीत विजय
By admin | Published: May 07, 2017 7:39 PM