शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

मुंबईचा बंगळुरूवर दणदणीत विजय

By admin | Published: May 01, 2017 8:03 PM

मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरूचा 5 विकेट्सने पराभव केला. या रॉयल विजयाच्या जोरावर पुन्हा एकदा मुंबईकरांनी गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेताना 16 गुणांची कमाई केली. त्याचवेळी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या आरसीबीला आणखी एका पराभवास सामोरे जावे लागले. नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आक्रमक सुरुवात केल्यानंतर मुंबईकरांच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा डाव निर्धारित षटकात 8 बाद 162 धावांवर रोखला गेला. मुंबईकरांनी या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना एक चेंडू राखून 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या.कर्णधार रोहित शर्माने शानदार कॅप्टन इनिंग खेळताना नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने 37 चेंडूंना सामोरे जाताना 6 चौकार आणि एका षटकाराने आपली खेळी सजवली. धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर फॉर्ममध्ये असलेला पार्थिव पटेल बाद झाल्याने मुंबईकरांना सुरुवातीलाच झटका बसला. परंतु जोस बटलर (21 चेंडूत 33) आणि नितिश राणा (28 चेंडूत 27) यांनी 61 धावांची वेगवान भागीदारी करून मुंबईला सावरले. हे दोघे संघाला सहज विजय मिळवून देणार असे दिसत असतानाच, मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली.पवन नेगीने बटलर आणि राणा या दोघांनाही झटपट बाद करून आरसीबीला पुनरागमन करुन दिले. रोहित शर्मा - केरॉन पोलार्ड जोडी जमली असे दिसत असतानाच युझवेंद्र चहलने पोलार्डला बाद केले. पाठोपाठ कृणाल पांड्या जखमी झाल्याने निवृत्त झाला, तर कर्ण शर्मालाही फारशी चमक दाखवता आली नाही. यावेळी, अचूक माऱ्याच्या जोरावर पुनरागमन केलेला आरसीबी संघ पराभवाची मालिका संपुष्टात आणणार असेच चित्र होते. परंतु हिटमॅन रोहितने आरसीबीचे स्वप्न धुळीस मिळवताना अखेरपर्यंत संयमाने फटकेबाजी करुन मुंबईचे विजयी सत्र कायम राखले. हार्दिक पांड्याने (नाबाद 14) रोहितला चांगली साथ देत मुंबईच्या विजयात योगदान दिले. आरसीबीकडून नेगीने 2 बळी घेतले. तसेच, अंकित चौधरी, चहल आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, आघाडीची फळी ठराविक अंतराने बाद झाल्यानंतर धडाकेबाज एबी डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने समाधानकारक मजल मारली. डिव्हिलियर्सने 27 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांसह 43 धावांचा तडाखा दिला. त्याचवेळी, कर्णधार कोहली (20), मनदीप सिंग (17), ट्राविस हेड (12), केदार जाधव (28) आणि शेन वॉटसन (3) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. नेगीने (35) अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीला दीडशेचा पल्ला पार करता आला. मिशेल मॅक्क्लेनघनने 3, तर कृणाल पांड्याने 2 बळी घेत आरसीबीच्या आक्रमक फलंदाजीला जखडवून ठेवले. .........................................संक्षिप्त धावफलक :रॉयल चँलेंजर्स बंगळुरू : 20 षटकात 8 बाद 162 धावा (एबी डिव्हिलियर्स 43, पवन नेगी 35; मिशेल मॅक्क्लेनघन 3/34, कृणाल पांड्या 2/34) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : 19.5 षटकात 5 बाद 165 धावा (रोहित शर्मा नाबाद 56, जोस बटलर 33; पवन नेगी 2/17)